Best Tourist Places In Maharashtra : सध्या महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस कोसळत आहे. मान्सूनचा पाऊस सुरु झाला की पर्यटकांची पाऊले आपोआप हिल स्टेशन्स किंवा नैसर्गिक पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी ओढ घेत असतात. महाराष्ट्रात तुम्हाला पावसाळ्यात फिरण्यासाठी अनेक पर्यटन स्थळे आहेत.
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांना भेट देऊन तुम्ही तुमच्या सहलीचा आनंद दुप्पट करू शकता. तसेच जर तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी असाल तर तुम्हाला महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी जास्त खर्च देखील येणार नाही.
महाराष्ट्रातील हिल स्टेशन्स, किल्ले आणि प्राचीन वारसा असणाऱ्या पर्यटन स्थळांना तुम्ही या पावसाळ्यात भेट देऊ शकता. महाराष्ट्रातल्या सह्याद्री पर्वतरांगामध्ये तुम्ही ट्रेकिंग करून सहलीचा आनंद वाढवू शकता.
1. भीमाशंकर, पुणे
तुम्ही पुण्यापासून काही अंतरावर असलेल्या भीमाशंकर या ठिकाणाला भेट देऊन यंदाच्या मान्सूनचा आनंद घेऊ शकता. भीमाशंकर येथे १२ ज्योतिर्लिंगपैकी एक महादेवाचे मंदिर आहे. या ठिकाणी तुम्ही मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत फिरायला जाऊ शकत.
तसेच येथील अभयारण्यात तुम्ही दुर्मिळ प्राणी आणि पक्षी पाहू शकता. मुंबईपासून भीमाशंकर हे पर्यटन स्थळ 220 किमी अंतरावर आहे. मुंबईहून या ठिकाणी तुम्हाला येण्यासाठी ५ तासांचा कालावधी लागेल. तसेच पुण्यापासून भीमाशंकर हे ठिकाण 110 किमी अंतरावर आहे. पुण्याहून या ठिकाणी तुम्हाला जाण्यासाठी ३ तासांचा कालावधी लागू शकतो.
2. माथेरान, रायगड
तुम्हालाही हिल स्टेशन्सला भेट देईची असेल तर माथेरान या हिल स्टेशन्सला भेट देऊन तुमच्या सहलीचा आनंद वाढवू शकता. माथेरान हे सर्वात लहान हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी तुम्ही लुईसा पॉइंट, पॅनोरमा पॉइंट, मंकी पॉइंट, पोर्क्युपिन पॉइंट, इको पॉइंट आणि प्रबल फोर्टला भेट देऊ शकता.
पावसाळ्यात या ठिकाणी फिरायला जाणे तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते. मुंबईपासून माथेरान 80 किमी लांब आहे तर या ठिकाणी तुम्हाला जाण्यासाठी 2 तासांचा कालावधी लागू शकतो. तसेच पुण्यापासून माथेरान 125 किमी लांब आहे. तर या ठिकाणी तुम्हाला जाण्यासाठी 2.5 तासांचा कालावधी लागू शकतो.
3. अलिबाग, रायगड
तुम्हाला जर समुद्र किनाऱ्यावर फिरायला जायचे असेल तर अलिबाग हे ठिकाण सर्वोत्तम आहे. अलिबागला मोठा समुद्र किनारा लाभला आहे. या ठिकाणी तुम्ही मुरुड-जंजिरा किल्ला पाहू शकता. अलिबागचा नयनरम्य किनारा दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करतो.
मुंबईपासून अलिबाग हे पर्यटन स्थळ ९८ किमी लांब आहे तर या ठिकाणी तुम्हाला जायला २ तास ४२ मिनिटांचा कालावधी लागू शकतो. पुण्यापासून अलिबाग 141 किमी लांब आहे तर या ठिकाणी तुम्हाला जायला 3 तास 11 मिनिटांचा कालावधी लागू शकतो.
4. कर्नाळा, रायगड
तुम्हाला किल्ल्यावर पावसाळ्यात फिरायला जायचे असेल तर कर्नाळा या किल्ल्यावर जाऊ शकता. ट्रेकिंगसाठी हा किल्ला सर्वोत्तम आहे. या ठिकाणी तुम्ही पावसाळ्यात नयनरम्य परिसर पाहू शकता. तसेच पावसाळ्यात या ठिकाणी तुम्ही सुंदर धबधबे पाहू शकता.
मुंबईपासून कर्नाळा हे पर्यटन स्थळ 50 किमी अंतरावर आहे. या ठिकाणी तुम्हाला जाण्यासाठी 1 तास 17 मिनिटे लागू शकतात. तर पुण्यापासून कर्नाळा हे ठिकाण 121 किमी अंतरावर आहे. या ठिकाणी पुण्यावरून जाण्यासाठी 2 तास 11 मिनिटे लागू शकतात.