नवी दिल्ली : आपण रोजच्या आहारात (Diet) असे अनेक मिश्र पदार्थ (Mix Food) खाते, ज्याचे परिणाम आपल्याला माहीत नसतात. त्यामुळे शरीरात (Body) कालांतराने आजार (Illness) वाढू लागतात. त्यामुळे अनेकवेळा आहारतज्ज्ञ (Dietitian) मिश्र पदार्थ खाणे टाळावे असा सल्ला देत असतात.
त्यापैकीच एक म्हणजे दूध आणि मासे (Milk and Fish) यांचा एकत्रित वापर करावा की नाही. माशांसोबत दूध पिऊ नये, असा अनेकांचा समज आहे. तो योग्य की अयोग्य हे जाणून घेऊयात.
आयुर्वेदात (Ayurveda) काय म्हटलंय? दूध हा प्राणीजन्य पण शाकाहारी पदार्थ (Vegetarian foods) असून मासे हे मांसाहारी प्रकारात मोडतात. या दोन्ही खाद्यपदार्थांची प्रकृती भिन्न असल्यानं त्यांचा एकत्रित वापर करू नये, असे आयुर्वेदात (Ayurveda) सांगितलं आहे. शरीरासाठी दूध थंड असतं तर माशांमुळे शरीरात उष्णता निर्माण होते.
अशा पद्धतीनं दोन भिन्न प्रकृतीच्या पदार्थांची मिसळ केली, तर शरीरात विविध घातक रसायने तयार होतात आणि त्याचा शरीरावर विपरित परिणाम होतो. ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली नाही, अशांनी अशा प्रकारचं जेवण करू नये, असं आहारतज्ज्ञ सांगतात.
दूध व मासे याबद्दलही असाच गैरसमज आहे. दूध व माशांचा वापर करून केलेले पदार्थ आजारांचं कारण होत असल्याबाबत आजवर कोणतेही दाखले मिळालेले नाहीत. शास्त्रीयदृष्ट्या केवळ या दोन खाद्यपदार्थांची अॅलर्जी असली, तरच काही समस्या उद्भवू शकतात. या दोन्ही खाद्यपदार्थांमध्ये भरपूर पोषणमूल्यं आहेत.
त्यामुळेच काही खाद्यसंस्कृतींमध्ये यांचा एकत्रित वापर केला जातो. मासे योग्य पद्धतीनं शिजवले गेले नाहीत, एखाद्या व्यक्तीला लॅक्टोजची अॅलर्जी असेल किंवा माशांची अॅलर्जी असेल, तरच त्वचेवर रॅश येणं किंवा तत्सम आजार उद्भवू शकतात.
एकंदरीतच मासे आणि दूध यांचा एकत्रित वापर (Food Combination) करून केलेला खाद्यपदार्थ चवीला चांगला लागेल, पण असे पदार्थ उत्तम आरोग्यासाठी योग्य नसतात. त्यामुळे दीर्घकाळासाठी अशा पदार्थांचं सेवन करू नये. तसेच ज्यांची पचनशक्ती कमकुवत असते, अशांनीही हे पदार्थ खाणे टाळावेत.