Budh Gochar 2024 : बुध, ग्रहांचा राजकुमार, दर 21 दिवसांनी राशिचक्र बदलतो. बुध जेव्हा आपली हालचाल बदलतो, तेव्हा त्याचा परिणाम पृथ्वीसह मानवी जीवनावरही दिसून येतो. अशातच फेब्रुवारीमध्ये बुध दोनदा आपला मार्ग बदलणार आहे. ज्याचा परिणाम चार राशींच्या लोकांवर दिसून येणार आहे.
बुध ग्रहाचे पहिले संक्रमण 1 फेब्रुवारीला होणार आहे, या काळात बुध मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर 20 फेब्रुवारीला मकर राशीतून निघून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. बुधाचे दोनदा संक्रमण काही राशींसाठी खूप शुभ मानले जात आहे. म्हणजेच बुधाची कृपा 7 मार्चपर्यंत लोकांवर राहील.
वैदिक ज्योतिषात बुध ग्रहाला बुद्धिमत्ता, ज्ञान, शिक्षण, वाणी, भाषा आणि व्यवसाय यांचा कारक मानला जातो. अशातच हा ग्रह जेव्हा संक्रमण करतो तेव्हा त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. चला जाणून घेऊया बुध संक्रमणामुळे कोणत्या राशींना फायदा होईल-
वृषभ
फेब्रुवारीमध्ये होणारी दोन्ही संक्रमणे वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरतील. या काळात धार्मिक कार्यात रुची वाढेल. यशाची शक्यता असेल. नशीब तुमच्या बाजूने असेल. करिअरशी संबंधित चांगली बातमी मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल. अडकलेले पैसे परत मिळतील.
तूळ
तूळ राशीच्या लोकांनाही फायदा होईल. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित वाद संपतील. यश मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ राहील. लव्ह लाईफ देखील चांगली राहील.
धनु
धनु राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल. तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये तुम्हाला फायदा होईल. तुमच्या निर्णयाचे कौतुक केले जाईल.
वृश्चिक
वृश्चिक राशींसाठीही दोन्ही संक्रमणे शुभ असतील. धैर्य आणि शौर्य वाढेल. मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. यश मिळण्याची शक्यता आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. नवीन घर किंवा वाहन खरेदी होण्याची शक्यता आहे.