Budhaditya rajyog 2023 : ग्रह आणि राजयोग यांना ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व दिले जाते. जेव्हा-जेव्हा एखादा ग्रह ठराविक काळाच्या अंतराने आपली राशी बदलतो तेव्हा विशेष योग तयार होतात, काहीवेळेला राजयोगही तयार होतो. दरम्यान, तूळ राशीत राजयोग येत आहे ज्याचा इतर राशींवर शुभ प्रभाव दिसून येणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि बुध यांनी मिळून तूळ राशीमध्ये बुधादित्य राजयोग तयार केला आहे, जो नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 3 राशींसाठी शुभ राहणार आहे, कारण नोव्हेंबरमध्ये बुध पुन्हा दुसऱ्या राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने तयार झालेला बुधादित्य राजयोग अत्यंत शुभ मानला जातो.
असे म्हणतात की, ज्या राशींमध्ये बुधादित्य राजयोग तयार होतो, त्या लोकांचे नशीब खुलते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. तुळ राशीमध्ये मंगळ आणि केतू देखील असतात, अशा स्थितीत बुद्धादित्य राजयोग तयार होतो. तूळ राशीतील या चार ग्रहांमुळे चतुर्ग्रही योगही तयार होतो आहे. जो फलदायी ठरणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार आदित्य म्हणजे सूर्य, अशा प्रकारे जेव्हा सूर्य आणि बुध हे दोन्ही ग्रह कुंडलीत एकत्र असतात तेव्हा बुधादित्य योग तयार होतो. बुधादित्य योग कुंडलीत ज्या घरामध्ये असतो त्या घराला बळ देतो. कुंडलीत बुध आणि रवि एकत्र आल्यास विशेष परिणाम प्राप्त होतात.ज्या व्यक्तीच्या कुंडलीत बुधादित्य योग तयार होतो तेव्हा त्याला धन, सुख, वैभव, मान-सन्मान प्राप्त होतो.
‘या’ राशींना मिळेल लाभ
मिथुन
हा योग मिथुन राशींसाठी फलदायी ठरणार आहे. 6 नोव्हेंबरपर्यंतचा काळ करिअर आणि व्यवसायासाठी उत्तम राहील. करिअरमध्ये प्रगती आणि व्यवसायासाठी तुम्हाला मोठी रक्कम मिळू शकते. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. अविवाहित लोकांसाठी विवाह संबंध येऊ शकतात. तुळ राशीत तयार झालेल्या बुधादित्य राजयोगाच्या प्रभावामुळे तुम्ही नवीन कार खरेदी करू शकता. तसेच वडिलोपार्जित मालमत्तेतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. भौतिक सुख-सुविधा वाढतील आणि आरोग्य चांगले राहील.
धनु
बुध, सूर्य यांचा संयोग आणि बुधादित्य राजयोगाची निर्मिती धनु राशीसाठी उत्तम ठरेल. या काळात उत्पन्न वाढेल आणि नवीन योजना करण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायात नफा मिळविण्याची चांगली संधी मिळेल. तुम्हाला मोठी रक्कम मिळू शकते. अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील. मान-सन्मान वाढेल. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी हा सुवर्णकाळ आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि तुमच्या कामात यश मिळेल.
सिंह
बुधादित्य राजयोग लोकांसाठी भाग्यवान सिद्ध होऊ शकतो. नशिबाची मजबूत चिन्हे आहेत. ६ नोव्हेंबरपर्यंतचा काळ चांगला राहील. तुम्ही गुंतवणूक करू शकता, तुम्ही सतत नफा मिळवू शकता. तुम्हाला कोणताही व्यवसाय किंवा भागीदारीत काम सुरू करायचे असेल तर वेळ उत्तम राहील. आर्थिक बाजू मजबूत राहील, उत्पन्न वाढेल आणि करिअरमध्ये विशेष लाभ होतील. नोकरदार लोकांना नवीन संधी मिळतील आणि काही नवीन जबाबदारी मिळू शकेल. बेरोजगारांनाही चांगली नोकरी मिळू शकते.