Chanakya Niti : आजकाल प्रत्येकालाच यशस्वी व्यक्ती बनायचे असते. यासाठी काही लोक खरोखरच खूप मेहनत घेतात. पण काहीवेळेला मेहनतीचे योग्य फळ त्या व्यक्तीला मिळत नाही. तुम्हीही त्या व्यक्तींपैकी एक असाल ज्यांना मेहनत करूनही योग्य ते फळ मिळत नाही, तर तुम्ही तुमच्या जीवनात काही महत्वाचे बदल केले पाहिजे. जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात यशस्वी व्यक्ती बनायचे असेल तर चाणक्याच्या या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजे, याचा अवलंब करून तुम्ही नक्कीच जीवनात पुढे जाऊ शकता.
या लोकांशी मैत्री टाळा
चाणक्य नीतीनुसार, मूर्ख लोकांशी मैत्री करणे तुमच्या जीवनात अडचणी आणू शकतात, म्हणूनच चाणक्य नीतिशास्त्रात, अशा लोकांशी मैत्री न करण्याचा सल्ला दिला गेला आहे. असे लोक अनेकदा तुमच्या दुःखाचे कारण बनतात आणि त्यांच्याशी मैत्री केल्याने तुमच्या स्थितीवरही परिणाम होऊ शकतो. आचार्य चाणक्याच्या मतानुसार, तीन प्रकारचे लोक (मूर्ख, दानशूर पंडित आणि त्यांचे साथीदार) हे तुमच्या जीवनात अडचणी आणू शकतात, यामुळे तुमची आर्थिक स्थिती देखील कमकुवत होऊ शकते. म्हणूनच या लोकांपासून लांब राहणे तुमच्यासाठी कधीही चांगले. तुम्ही या लोकांपासून स्वतःला लांब ठेवले तर नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यात चांगले परिणाम जाणवतील.
योग्य जोडीदाराची निवड
आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार, चारित्र्यहीन स्त्रीची सेवा करून माणूस कधीही सुखी होऊ शकत नाही. म्हणूनच कधीही जोडीदाराची निवड करताना विचारपूर्वक करा, आचार्य चाणक्य मानत होते की पुरुषाचे यश आणि आनंद पत्नीच्या चारित्र्यावर आणि नैतिकतेवर अवलंबून असतो. दुष्ट स्वभावाच्या स्त्रिया कधीही कुटुंबाच्या कल्याणाचा विचार करू शकत नाहीत. त्यामुळे माणसाचा खिसा नेहमी रिकामा राहतो. अशा परिस्थितीत ती व्यक्ती आपले जीवन गरिबीत जगते. माणसाला श्रीमंत आणि गरीब बनवण्यात पत्नीचा मोठा हात असतो, म्हणूनच जोडीदाराची निवड करताना विचार करा.
नेहमी दुःखी असणाऱ्या व्यक्तीपासून लांब राहा
नेहमी दु:खी असणा-या व्यक्तीशी तुमचे नाते किंवा मैत्री असेल तर त्याचा तुमच्या मानसिक आणि आर्थिक स्थितीवर खोलवर परिणाम होतो. होय, आचार्य चाणक्याच्या मते, दुःखी व्यक्तीशी घनिष्ठ मैत्री केल्याने त्यांच्या आर्थिक समस्या वाढू शकतात आणि त्यांच्या विकासात अडथळा येऊ शकतो. अशा व्यक्ती आपल्या आयुष्यात असल्या तर त्यांचा नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होतो, म्हणूनच अशा व्यक्तींपासून अंतर ठवणे गरजेचे आहे, तरच तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकता.