मृत्यूनंतर माणूस स्वर्गात जाणार की नरकात हे त्याच्या कर्माने ठरवले जाते. चाणक्य नीतीमध्ये अशी काही कामे सांगितली आहेत, ती करणार्याला नरक भोगावा लागतो. चला जाणून घेऊया.
चाणक्य नीतीनुसार लोभी व्यक्ती कधीही कोणाचा नातेवाईक नसतो. पैसा, संपत्ती, इज्जत मिळवण्यासाठी आणि स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी तो इतरांचे नुकसान करायला मागेपुढे पाहत नाही. अशा लोकांना मृत्यूनंतर नरक भोगावा लागतो.
चाणक्य नीतीनुसार स्त्रियांचा अनादर करणारा, मुलींबद्दल वाईट विचार करणारा, गरिबांचे शोषण करणारा नरक भोगतो.
वाईट माणूस नेहमी त्याच्या बोलण्याने आणि वाईट कृतीने मानसिक आणि शारीरिक वेदना देतो. माणसाचे हे अवगुण त्याला नरकात घेऊन जातात.
चाणक्य नीती सांगते की जो सत्कर्म करून आपली जबाबदारी पार पाडतो, क्रोध, लोभ, कटु वाणीचा त्याग करून जगतो त्याला स्वर्गात स्थान मिळते.