Chanakya Niti : आयुष्यात प्रत्येकाला काही संकटांचा सामना करावा लागतो. तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणाऱ्या माणसांची गरज तुम्हाला अशा वेळी खूप जास्त असते. तसेच तुमचे दु:ख समजून घेऊन त्याने तुमच्या समस्या सोडवाव्यात.
आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार आपल्या आयुष्यात अशा काही लोकांची संगत ठेवा ज्याचा फायदा तुम्हाला होईल. तसेच असेही काही लोक आहेत ज्यांच्या संगतीमुळे तुम्हाला कधीही प्रगती करता येत नाही. कोण आहेत हे लोक जाणून घेऊयात.
कधीही मूर्खांशी संगत करू नका
काही जणांना प्रत्येक परिस्थितीत स्वतःला सर्वोच्च मानण्याची सवय असते. त्यांना वाटते की ते कधीही चुकीचे असू शकत नाहीत आणि ते इतरांच्या योग्य गोष्टीही कधी मानत नाही. असे लोक समोरचे कोणाचेही ऐकत नसून आचार्य चाणक्यांच्या मतानुसार असे लोक मूर्ख असतात. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहावे. ते फक्त तुमचा वेळ वाया घालवत असतात आणि अतिआत्मविश्वासामुळे ते अनेक वेळा चुकीचे निर्णय घेत असतात, मग ते आपल्या प्रगतीसाठी हानिकारक ठरले जातात.
रडणारे लोक
काही जण कोणतीही परिस्थिती असो ते कधीच आनंदी नसतात. त्यांच्याकडे सर्व काही असते, परंतु काहीही केले तरी सर्वांसमोर रडण्याची त्यांची सवय जात नाही. अशा लोकांसोबत राहिल्याने समोरची व्यक्तीही नकारात्मक विचार करू लागते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे काम करण्यापूर्वी हार मानते. त्यामुळे चाणक्यांनी अशा लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
दुष्ट स्वभावाच्या महिला
काही महिला अशा आहेत की ज्या केवळ स्वतःच्या जोरावर घर चालवत असून त्या आपला दृष्टिकोन मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जात असल्याने घरात वादाचे कारण बनते. आपले काम पूर्ण करण्यासाठी त्या अनेकदा खोटे बोलतात. कडू शब्दांचा वापर करत असतात. त्यामुळे अशा दुष्ट स्वभावाच्या महिलांपासून दूर राहा. अशा महिला तुमच्या आयुष्यात अडथळा निर्माण होतो.