Chanakya Niti : महान अर्थशास्त्रज्ञ तसेच विचारवंत आचार्य चाणक्य हे त्यांच्या धोरणांसाठी खूप प्रसिद्ध आहेत. त्यांना समाजाची सखोल जाण होती, म्हणून त्यांनी एक धोरण तयार केले असून त्यात त्यांनी लोकांना आनंदी, यशस्वी आणि प्रतिष्ठित जीवन कसे जगावे हे सांगितलेले आहे.
तसेच आचार्य चाणक्यांची धोरणे आजच्या काळातही खूप प्रासंगिक मानण्यात येतात.असे मानले जाते की जो व्यक्ती या धोरणांचे पालन करतो, त्याला त्याच्या आयुष्यात कधीही अपयशाला सामोरे जावे लागत नाही.
आचार्य चाणक्यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यांचे पालन केले तर तुम्ही लवकरात लवकर कोणत्याही समस्येतून बाहेर पडू शकता. तसेच त्यांनी आपल्या नीतिशास्त्राच्या चौथ्या अध्यायात म्हातारपण लवकर येण्यामागची कारणे सांगितली आहेत.
चाणक्य नितीशास्त्राच्या चौथ्या अध्यायाच्या १७ व्या श्लोकामध्ये चाणक्य यांनी स्त्री, पुरुष आणि घोडा यांच्या वृद्धावस्थेबद्दल सांगितले आहे. यात चाणक्यांनी एका श्लोकाद्वारे असे सांगितले आहे की लोक लवकरात लवकर वृद्ध कसे होतात आणि ते कशाप्रकारे टाळता येते.
अध्वा जरा मनुष्णियान वजिनां बधंन जरा ।
अमिथुन जरा स्त्रीलिंगी वस्त्राना मतपो जरा ।
चाणक्य नीतीच्या चौथ्या अध्यायाच्या सतराव्या श्लोकामध्ये असे लिहिले आहे की, जो व्यक्ती नेहमी प्रवास करतो, तो लवकरात लवकर वृद्धत्वाचा शिकार होतो. कारण त्याच्यावर प्रवासाचा थकवा आणि अस्वच्छ खाण्याच्या सवयी विपरीत परिणाम करत असतात.
तसेच घोडा कधी म्हातारा होत नाही अशी एक म्हण आहे. परंतु समजा एखाद्या माणसाने घोडा पाळला असेल आणि त्याला सारखे बांधून ठेवले तर तो लवकरात लवकर म्हातारा होतो. कारण ते त्याच्या भौतिक स्वरूपाच्या पूर्ण विरुद्ध आहे.
चाणक्यनीतीमध्ये स्त्रियांबद्दल जे वर्णन केले आहे ते थोडेसे विचित्र असले तरी खरे आहे. चाणक्य शास्त्रानुसार जर पती पत्नीला शारीरिक सुख देत नसल्यास ती असंतुष्ट राहते आणि ती लवकर वृद्ध होते.