Chandra Grahan 2024 : देशात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. मार्च महिन्यामध्ये होळी आहे. तसेच याच महिन्यात चंद्रग्रहण देखील होणार आहे. हे 2024 या वर्षातील पहिले चंद्रग्रहण असणार आहे.
2024 या वर्षातील पहिले चंद्रग्रहण आणि होळी योगायोगाने एकाच दिवशी होत आहे. 25 मार्च 2024 रोजी चंद्रग्रहण आणि होळी आहे. यावर्षी होळीदिवशीच चंद्रग्रहणाची छाया पडणार आहे. हिंदू धर्मियांकडून होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो.
हिंदू धर्मात चंद्रग्रहण अशुभ मानले जाते
चंद्रग्रहण अशुभ मानले जाते. कारण चंद्रग्रहणाचा परिणाम सर्वच राशींवर होत असतो. चंद्रग्रहणामुळे नकारात्मकता येते असे मानले जाते. काही राशींवर त्याचा खूपच परिणाम होत असतो तर काही राशींवर त्याचा कमी प्रमाणात प्रभाव पडत असतो.
हिंदू लोकांचे नवीन वर्ष देखील मार्च महिन्यातच सुरु होणार आहे. होळीनंतर हिंदू धर्मियांचे नवीन वर्ष सुरु होणार आहे. विज्ञानामध्ये ग्रहण ही खगोलीय घटना मानली जाते, परंतु हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात ग्रहण अशुभ मानले जाते.
वर्षातील पहिले चंद्रग्रहण
25 मार्च 2024 रोजी पहिले चंद्रग्रहण होणार आहे. चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेला होत असते. 25 मार्च 2024 रोजी हे चंद्रग्रहण सकाळी 10:41 वाजता सुरू होईल आणि सुमारे 3:01 वाजता समाप्त होईल. वर्षातील पहिले चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही.
भारतातील सुतक कालावधी आणि कुठे दिसणार?
वर्षातील पहिले चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे त्याचा सुतक कालावधी भारतात वैध ठरणार नाही. चंद्रग्रहण आयर्लंड, जर्मनी, फ्रान्स, हॉलंड, बेल्जियम, दक्षिण नॉर्वे, स्वित्झर्लंड, इंग्लंड, स्पेन, पोर्तुगाल, इटली, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, जपान, रशियाचा पूर्व भाग आणि आफ्रिकेमध्येही दिसणार आहे.