Chankya Niti:- आचार्य चाणक्य हे सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे मुख्य सल्लागार आणि मंत्री होते हे आपल्याला माहिती आहे. त्यांनी त्या कालावधीत जे काही धोरणे सांगितलेली आहेत ते आज देखील जीवनामध्ये खूप फायद्याचे ठरताना दिसून येतात.
त्यांनी त्यांच्या चाणक्य नीतिमध्ये जीवनाचे असे अनेक भागांवर सविस्तर माहिती दिलेली आहे. मानवी जीवन यशस्वी होण्यासाठी त्यांनी अनेक प्रकारचे मार्ग सांगितले असून या मार्गांचा जर जीवनामध्ये वापर केला किंवा अवलंब केला तर मानवी जीवनाला सुख समृद्धीच्या दृष्टिकोनातून खूप मोठा फायदा होतो.
तसेच घरामध्ये धनप्राप्ती किंवा लक्ष्मीचा वास असावा या दृष्टिकोनातून देखील त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत.
या गोष्टींचे पालन जर घरामध्ये झाले तर त्या घरामध्ये धनलाभ होतो असे चाणक्य म्हणतात. नेमके याबाबतीत आचार्य चाणक्य यांनी काय म्हटले आहे? याबाबतची माहिती आपण या लेखात घेऊ.
या घरांमध्ये असतो लक्ष्मीचा वास
1- ज्या घरामध्ये होतो अन्नाचा सन्मान– आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या घरामध्ये अन्नाचा नेहमी मानसन्मान किंवा आदर केला जातो अशा घरांमध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता राहत नाही.
लक्ष्मी मातेच्या कृपेमुळे अशा घरांची भांडी नेहमी धनाने भरलेली असतात व या उलट मात्र ज्या घरामध्ये अन्नाचा आदर केला जात नाही किंवा अन्न मोठ्या प्रमाणावर वाया घालवले जाते. अशा घरांमध्ये माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचा वास राहत नाही.
2- घरामध्ये ज्ञानी मनुष्याचा आदर– ज्या घरामध्ये ज्ञानी व्यक्तीचा आदर राहत नाही अशा घरामध्ये लक्ष्मी वास करत नाही. त्यामुळे घरामधील ज्ञानी व्यक्तीचा नेहमी आदर करणे गरजेचे आहे.
कारण घरातील असे ज्ञानी व्यक्ती तुम्हाला जीवनात योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देत असतात. त्या उलट मात्र मूर्ख लोकांमुळे तुम्ही अनेक समस्यांनी घेरले जातात व त्यामुळे व्यक्तीने नेहमी ज्ञानी माणसाच्या संपर्कात राहणे गरजेचे आहे.
3- घरामधील पती–पत्नीचे नाते– आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या घरामध्ये पती-पत्नी या दोघांमधील नाते प्रेमाचे व आदराचे असते अशा घरांमध्ये नेहमी शांततेचे वातावरण असते आणि लक्ष्मी त्या ठिकाणी वास करत असते.
ज्या घरांमध्ये पती-पत्नी एकमेकांचा आदर करत नाही व भांडतात त्या घरामध्ये नेहमी गरिबीची स्थिती राहते. घरामध्ये लक्ष्मीचा वास राहावा याकरिता पती-पत्नीने एकमेकांशी आदर व सन्मानाने वागले पाहिजे.