लाईफस्टाईल

Cholesterol Reducing Foods : कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश !

Cholesterol Reducing Foods : आजकालच्या खराब जीवनशैलीमुळे लोकांना लहान वयातच अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. काही आजार खूप सामान्य असतात जे कमी वेळात बरे होतात, परंतु हृदयाशी संबंधित आजार आणि शिरांमध्ये जमा होणारे कोलेस्टेरॉल शरीरासाठी खूप हानिकारक ठरतात. शरीरात खराब कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे हृदयविकार तर होतोच पण इतरही अनेक आजार होतात.

अशास्थितीत शरीरातून खराब कोलेस्टेरॉल काढून टाकणे खूप गरजेचे आहे. यासाठी आपल्याला आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आजच्या या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते, ते सांगणार आहोत. चला तर मग…

कोणत्या गोष्टींचे सेवन केल्याने कोलेस्टेरॉल कमी होते?

ड्राय फ्रुट्स

रोज थोड्या प्रमाणात ड्राय फ्रुट्सचे सेवन केल्याने वाईट कोलेस्टेरॉलही दूर होऊ शकते. ड्राय फ्रुट्स मध्ये असलेले पोषक तत्व शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. याचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्यही चांगले राहते.

ओट्स

ओट्स हे नेहमीच आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले गेले आहे. खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ओट्स अधिक फायदेशीर ठरतात. यामध्ये फायबर आढळते जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. तुमच्या रोजच्या आहारात ओट्सचा समावेश केल्यास शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल लवकर कमी होईल.

एवोकॅडो

एवोकॅडो हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्याचा दररोज आहारात समावेश केल्याने खराब कोलेस्ट्रॉलची पातळी हळूहळू कमी होते. तसेच याचे अनेक फायदे देखील आहेत.

सोयाबीन

आपल्या आहारात सोयाबीनचा समावेश केल्यास शरीरात जमा झालेले खराब कोलेस्ट्रॉल कमी होते. सोयाबीनचे सेवन अनेक प्रकारे करता येते.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts