Credit score : सध्या सर्वत्र पाहिले तर लोक मोठ्या प्रमाणात स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याकडे वळाले आहेत. अशा वेळी तुम्हाला भांडवलाची मोठ्या प्रमाणात गरज असते. तेव्हा तुम्हाला सर्वात जास्त मदत करते ती बँक आहे.
फक्त व्यवसाय करण्यासाठीच नाही तर मुलांचे शिक्षण, घर बांधणे, यासाठी तुम्हाला पैशांची खूप गरज असते. अशा वेळी जेव्हा तुम्ही बँकेत जाता तेव्हा सर्वात आधी तुमचा क्रेडिट स्कोअर तपासला जातो. क्रेडिट स्कोअरमुळे तुम्हाला कर्ज मिळेल की नाही हे ठरवले जाते.
जर तुमचा क्रेडिट स्कोअर खराब असेल तर तुम्हाला कोणतीही बँक कर्ज देणार नाही. अशा वेळी जर तुमचा क्रेडिट स्कोअर खराब असेल आणि तुम्हाला कर्जाची गरज असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी खराब क्रेडिट स्कोअर चांगला कसा करायचा याच्या टिप्स सांगत आहे. या सर्व टिप्स तुम्ही सविस्तर खाली पहा.
1. क्रेडिट रिपोर्ट वर लक्ष ठेवा
कधीकधी तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये चुकीची माहिती टाकली जाते ज्यामुळे तुमचा स्कोअर खराब होतो. अशा वेळी जर तुम्हाला हे थांबवायचे असेल तर एकमेव मार्ग म्हणजे नियमितपणे तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासणे हा आहे. यामध्ये जर तुम्हाला चुकीची माहिती वाढली तर तुम्ही क्रेडिट ब्युरोला याबाबत माहिती द्या.
2. क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरा
तुम्ही घेतलेलं कर्ज वेळेवर भरलेच पाहिजे. हे क्रेडिट कार्ड बिल प्रत्येक महिन्यात पूर्ण भरणे आवश्यक आहे. यातून तुमचा व्यवहार कसा आहे समजते. अशा वेळी चांगला क्रेडिट स्कोअर ठेवायचा असेल तर तुम्हाला वेळेवर कर्जाचे पेमेंट करणे गरजेचे आहे.
जर तुमचे क्रेडिट कार्डचे बिल जास्त असेल तर ते नियोजित पद्धतीने भरा. म्हणजेच संपूर्ण थकबाकी लवकरात लवकर भरण्यासाठी दरमहा किमान बिलाच्या रकमेपेक्षा जास्त रक्कम भरा.
3. वेळेवर पैसे द्या
तुमचा क्रेडिट स्कोअर तुम्ही क्रेडिट कार्ड बिल किंवा कर्जाच्या पेमेंटमध्ये दिलेल्या वेळेनंतर काही डिफॉल्ट केले आहे की नाही यावर बरेच काही अवलंबून असते. किंबहुना, वेळेवर पैसे न देणे हे डीफॉल्ट मानले जाते.
ज्याप्रमाणे तुम्ही केलेल्या पेमेंटचा रेकॉर्ड तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये नोंदवला जातो, त्याचप्रमाणे डीफॉल्ट्स देखील असतात. डिफॉल्टिंगमुळे तुमचा क्रेडिट स्कोअर घसरतो. म्हणूनच वेळेवर पेमेंट करण्याचा नेहमी सल्ला दिला जातो.
4. जबाबदारीने कर्ज घ्या
कर्ज घेताना नेहमी एक विचार नक्की करावा की जर आपल्याला कर्ज भेटले तर ते आपण भरू शकतो का. अशा वेळी तुम्ही कर्ज घेताना तुम्हाला परतफेड करता येईल एवढेच कर्ज घ्या. यामुळे बँक तुम्हाला एक जबाबदार कर्जदार असल्याचे समजते.
तसेच, जेव्हा कर्जाचा प्रश्न येतो, तेव्हा कर्ज देणाऱ्या संस्था तुम्हाला काय सांगतात याची पर्वा न करता तुम्ही जे परतफेड करू शकता तेच कर्ज घ्या.
5. एकापेक्षा जास्त कर्जासाठी अर्ज करू नका
काही वेळा असे होते की लोक एक कर्ज चालू असताना दुसरे कर्ज घेत असतात. मात्र अशा वेळी तुम्ही अनेक ठिकाणाहून कर्ज घेतले तर तुम्हाला कर्ज भरताना आर्थिक ताणाताण होऊ शकते. यामुळे शक्यतो एका वेळी एकच कर्ज घ्यावे.
प्रत्येक वेळी क्रेडिट कार्ड किंवा कर्जासाठी अर्ज केला की त्याचा परिणाम क्रेडिट स्कोअरमध्ये घसरण होतो. जेव्हा तुम्ही बँक किंवा कर्ज देणाऱ्या संस्थेकडे क्रेडिट कार्ड किंवा कर्जासाठी अर्ज करता तेव्हा बँक क्रेडिट ब्युरोकडून तुमचा क्रेडिट अहवाल मागते.
यांनतर होणारी चौकशी तुमचा क्रेडिट स्कोअरवर परिणाम करते. कारण जितक्या जास्त वेळा कठोर चौकशी होते, तितका तुमचा स्कोअर कमी होतो. जे तुमच्यासाठी खूप चिंताजनक आहे.