लाईफस्टाईल

Cucumber In Winter Season : हिवाळ्यात करू नका काकडीचे सेवन, होऊ शकतात ‘या’ समस्या !

Cucumber In Winter Season : जेवणासोबत प्रत्येकाला सॅलड खाण्याची सवयी असते. सॅलड मध्ये कच्च्या भाज्या, काकडी इत्यादींचा समावेश असतो. कच्च्या भाज्यांमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते, त्यामुळे अन्नासोबत त्यांचे सेवन केल्याने पचनक्रिया निरोगी राहते. अनेकजण रोज सलाडमध्ये काकडीचे सेवन करतात.

शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. पण हिवाळ्यात काकडीचे सेवन करावे का? त्याच्या सेवनाने काही आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात का? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

हिवाळ्यात काकडी खावी का?

हिवाळ्यात शरीरात उष्णता राहावी म्हणून जास्त गरम पदार्थांचे सेवन केले जाते. पण काकडीचा स्वभाव थंडावा असतो, त्यामुळे जास्त प्रमाणात खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. ज्यांना सर्दी-खोकला आहे किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे अशा लोकांनी हिवाळ्यात काकडी खाऊ नये. पण जर एखाद्याला काकडी खाण्याची सवय असेल तर ती दुपारच्या वेळी खाऊ शकतो. या काळात वातावरणाचे तापमान सामान्य असते, त्यामुळे काकडी खाल्ल्याने आरोग्याला कोणतीही हानी होत नाही. पण जर तुम्ही हिवाळ्यात जास्त प्रमाणात काकडी खाल्ले तर त्यामुळे काही आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.

हिवाळ्यात काकडीचे सेवन करण्याचे दुष्परिणाम !

-हिवाळ्यात काकडीचे सेवन केल्यास पचनास त्रास होऊ शकतो. काकडीचा कूलिंग इफेक्ट असतो आणि त्यात cucurbitines नावाचे कंपाऊंड देखील असते. या गोष्टींमुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे पोटदुखी, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवतात.

-हिवाळ्यात आपली प्रतिकारशक्ती कमकुवत होते, त्यामुळे आपण वारंवार आजारी पडतो. अशा परिस्थितीत काकडीचे सेवन केल्यास खोकला, सर्दी किंवा ताप यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

-काकडीमध्ये असलेले Cucurbitins शरीरातील विषारी पदार्थ वाढवण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे यकृत आणि किडनीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. म्हणून शक्यतो हिवाळ्यात काकडीचे सेवन टाळावे.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts