Petrol-Diesel : देशाच्या विविध भागांत झालेल्या मुसळधार पावसामुळे लोकांनी प्रवासाचे बेत पुढे ढकलणे पसंत केले. सोबतच कृषी क्षेत्रातील इंधनाच्या मागणीतही घट झाल्याचा डिझेलच्या एकूण मागणीवर परिणाम झाला आहे.
त्यामुळे जुलैमध्ये देशात पेट्रोलचा+- वापर वाढला, तर मान्सूनच्या पावसामुळे डिझेलची मागणी घटली आहे. देशात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या डिझेल इंधनाची मागणी जुलैमध्ये वार्षिक ४.३ टक्क्यांनी घसरून ६१.५ लाख टनांवर आली आहे. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात खप १०.५ टक्क्यांनी घसरला होता, पण दुसऱ्या पंधरवड्यात त्यात वाढ झाल्याचे आकडेवारीमध्ये म्हटले आहे.
गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत जुलैमध्ये पेट्रोलची विक्री ३.८ टक्क्यांनी वाढून २७ ६ लाख टन झाली आहे. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात खप १०.५ टक्क्यांनी घसरला, पण नंतर तो वाढला.
पण मासिक आधारावर विक्री ४.६ टक्क्यांनी कमी झाली. देशातील उत्पादन आणि सेवा या दोन्ही क्षेत्रात वाढ होत असल्यामुळे मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यात पेट्रोल आणि डिझेलची मागणी वाढली. आकडेवारीनुसार, जुलै २०२१ मध्ये कोविडचा परिणाम झालेल्या महिन्याच्या तुलनेत जुलैमध्ये पेट्रोलचा वापर १६.६ टक्क्यांनी जास्त होता.
त्याचप्रमाणे, आढावा महिन्यात, डिझेलचा वापर जुलै २०२१ च्या तुलनेत १२.८ टक्क्यांनी वाढला आहे. हवाई प्रवासातील स्थिर वाढीमुळे विमान इंधनाची मागणी गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत जुलैमध्ये १०.३ टक्क्यांनी वाढून ६०३,५०० टनांवर गेली. जुलै २०२१ च्या तुलनेत हा आकडा दुप्पट आहे. मासिक आधारावर, हवाई इंधनाच्या विक्रीत सुमारे १.६ टक्के वाढ झाली आहे.