Diabetes Diet : मधुमेह हा जीवनशैलीशी निगडित होणार आजार आहे. खराब जीवनशैलीमुळे हा आजार होतो. आजकाल मधुमेही रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, याचे मुख्य कारण म्हणजे खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी. अशातच ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांनी देखील स्वतःच्या खाण्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
अशा रुग्णांनी काहीही खाण्यापूर्वी विचार केला पाहिजे जेणेकरून रक्तदाब वाढू नये. या रुग्णांना तांदूळ पूर्णपणे सोडून देण्याचा सल्ला दिला जातो. पण मधुमेही रुग्ण तांदूळ मर्यादित प्रमाणात घेऊ शकतात. फक्त त्यांना भात खाताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. कोणत्या आहेत त्या गोष्टी पाहुयात…
-मधुमेहाच्या रुग्णांनी तांदूळ कुकरमध्ये शिजवण्याऐवजी कढईत शिजवावा. आणि भात शिजवताना पॅनवर आलेले पाणी पूर्णपणे काढून टाकावे हे लक्षात ठेवा. असे केल्याने त्यातील स्टार्च कमी होतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही.
-तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाला मधुमेह असेल तर शक्यतो भाताचे सेवन कमी करा. जास्त भात खाल्ल्याने स्टार्च आणि कार्बोहायड्रेट्स वाढते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी देखील वाढते.
-जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर भात खाल्ल्यानंतर विश्रांती घेणे किंवा झोपणे टाळा. भात खाल्ल्यानंतर चालणे आवश्यक आहे. त्यामुळे शरीरात चरबी जमा होत नाही आणि अन्नही सहज पचते.
-मधुमेहाच्या रुग्णांनी फक्त भात खाणे टाळावे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यासोबत चीज, अंडी, हिरव्या भाज्या, चिकन किंवा इतर फायबरयुक्त पदार्थ खाऊ शकता.
-जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर जास्त भात खाणे टाळावे. वास्तविक, भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो, जे खाल्ल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढते. त्यामुळे मधुमेही रुग्णांना त्रास होऊ शकतो.