Ajab Gajab News : गायींना स्वतःची अशी एक भाषा असते आणि त्या एकमेकींसोबत चारा-पाण्यासह हवामानाच्या बाबत संवाद साधत असतात, हे आम्ही सांगत नाही तर ऑस्टेलियामध्ये प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधामधील निष्कर्ष आहे.
सिडनी येथील विद्यापीठामध्ये ‘पीएचडी’ करत असलेल्या एलेग्जेंड्रा ग्रीन या संशोधक विद्यार्थ्याने गायीच्या हंबरण्यावर प्रबंध सादर केला. यामध्ये त्याने असा दावा केला आहे की, ‘होलस्टेन फ्रिजियन’ या प्रजातीच्या गायी त्यांच्या ओरडण्यामधून (हंबरणे) एकमेकींशी संवाद साधतात.
गायींच्या भाषांबाबत या संशोधकाने ‘गुगल ट्रान्सलेट फॉर काऊ’, या नावाने एक सॉफ्टवेअर तयार केले आहे. याचा वापर तो गायींचा आवाज म्हणजे त्यांची भाषा समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे.
नकारात्मक, सकारात्मक आणि भावनात्मक स्थितीमध्ये गायी कशा व्यक्त होतात. प्रत्येक गायींचा आवाज हा वेगवगळ्या प्रकारचा असतो आणि त्या त्यांच्या ‘मूड’प्रमाणे वर्तन करतात.
एका मायक्रोफोनच्या सहाय्याने गायींचा आवाज रेकॉर्ड करून त्यावर या संशोधकाने विश्लेषण केले आहे. इटली आणि फ्रान्स या देशांमधील काही सहयोगी संशोधक विद्यार्थ्यांच्या मदतीने ग्रीन लवकरच गायींच्या आवाजाचा शब्दकोष तयार करणार आहे.
चारा किंवा खुराक आणि हवामान याविषयीचा संवाद साधताना गायींचे हंबरणे अतिशय मधुर असल्याचा दावाही त्याने केला आहे. यासाठी त्याने १३ गायींचे शेकडो आवाज रेकॉर्ड केले आहेत.