Diwali 2023 : हिंदू धर्मात दिवाळी सणाला खूप महत्व आहे. या दिवसांत अनेक शुभ योग येतात, या दिवसांत काही गोष्टी घरात आणणे खूप शुभ मानले जाते. म्हणूनच आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या दिवाळीच्या दिवसात घरात आणणे शुभ मानले जाते.
खरं तर, हिंदू धर्मात सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी. यावर्षी हा सण 12 नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. या दिवशी माता लक्ष्मी आणि गणेशाची पूजा अगदी मनोभावे केली जाते. तसेच, घरात समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. शास्त्रानुसार या दिवशी विधीनुसार केलेले कार्य जीवन यशस्वी करते.
त्याचबरोबर दिवाळीच्या दिवशी घरामध्ये काही झाडे लावल्यास जीवनात आनंदाचे वातावरण येते आणि घरात सुख नांदते. ज्योतिषशास्त्रातही काही वनस्पतींना खूप महत्त्व आहे. आज आपण जाणून घेऊया ज्योतिष शास्त्रानुसार दिवाळीच्या दिवशी घरात कोणती झाडे घरात लावणे शुभ मानले जाते.
दिवाळीत तुमच्या घरात लावा ‘ही’ रोपे !
तुळशीचे रोप
दिवाळीच्या दिवशी घरात तुळशीचे रोप लावणे खूप शुभ मानले जाते. असे केल्याने घरात सकारात्मकता राहण्यास सुरुवात होते आणि नकारात्मकता दूर होते. एवढेच नाही तर लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यासोबत राहते. जीवन आनंदाने भरलेले राहते. दिवाळीच्या दिवशी तुळशीचे रोप लावणे शुभ मानले जाते.
या दिवशी तुळशीचे रोप लावल्याने जीवनातून पैशाशी संबंधित समस्या दूर होतात. परंतु या वनस्पतीची लागवड करण्यासाठी काही नियम आहेत ज्यांचे पालन करणे सर्वात महत्वाचे मानले जाते. हे रोप रविवारी लावू नये. यावेळी दिवाळी रविवारी असल्याने धनत्रयोदशीच्या दिवशी घरी हे रोप लावावे.
अपराजिता वनस्पती
अपराजिताचे झाड दिवाळीच्या दिवशी लावणे खूप शुभ मानले जाते. ही वनस्पती खूप शुभ मानली जाते. एवढेच नाही तर या वनस्पतीची फुले देखील खूप शुभ मानली जातात. त्यामुळे या दिवशी तुम्ही तुमच्या घरात हे रोप लावा, तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. जीवन संपत्ती आणि धान्यांनी भरलेले असेल.
‘ही’ रोपे देखील शुभ मानली जातात !
-मनी प्लांट
-कांदळ वनस्पती
-हरसिंगार वनस्पती