लाईफस्टाईल

Business Idea : मोबाईल कव्हर तयार करण्याचा बिझनेस करा, लाखो कमवाल, जाणून घ्या सविस्तर माहिती

Business Idea : जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमच्या नोकरीसह तुम्ही असा व्यवसाय सुरू करू इच्छित असाल जे कमी खर्चात सुरू करता येईल पण तुम्हाला इन्कम मात्र जास्त मिळेल तर आजची बातमी तुमच्यासाठी खूप खास आहे.

आज आम्ही तुम्हाला एक भन्नाट बिझनेस आयडिया सांगणार आहोत. मोबाइल फोन कव्हर तयार किंवा प्रिंट करण्याचा हा व्यावसाय आहे. या बिझनेसची एक खास गोष्ट म्हणजे या बिझनेसला मार्केटमध्ये जास्त मागणी आहे आणि तुम्ही हा बिझनेस साइड बिझनेस म्हणून करू शकता, तर चला जाणून घेऊया या बिझनेसबद्दल.

आजकाल अनेक जण स्वतःचा मोबाईल स्टायलिश कव्हरसह सुरक्षित ठेवण्यासाठी धडपडत असतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या मोबाइलची विक्री जितकी केली जात आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त मोबाईल कव्हरची विक्री होत आहे.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची गरज भासणार आहे. छोट्या ठिकाणी देखील तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला लॅपटॉप आणि काही छोट्या मशिन्सची गरज भासणार आहे.

या मशीनद्वारे तुम्ही मोबाईल कव्हर प्रिंट करू शकता. यासोबतच रंग, प्लॅस्टिकसारख्या इतर गोष्टी लागणार आहेत. जवळपास 60 हजार ते 65 हजार रुपयांमध्ये या वस्तू तुम्हाला मिळू शकतात. यानंतर तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.

बॅक कव्हर प्रिंट करण्यासाठी तुम्हाला 10 मिनिटे लागतील. जेव्हा तुमचा व्यवसाय चालू होईल, तेव्हा त्यातून कमाई देखील सुरू होईल. जेव्हा तुमचा व्यवसाय मोठा होतो, तेव्हा तुम्ही अधिक नफा मिळविण्यासाठी तुमचा ब्रँड प्रसिद्ध करू शकता. तुम्हाला भरपूर उत्पन्न यातून मिळू शकते.

* मोबाईल कव्हर बनवण्यासाठी कच्चा माल

डिझायनिंगसाठी लागणारी इंक

पेंटिंग साहित्य

पॉलिशिंग ऑइल लागेल

पॅकेजिंग सामग्री

* मोबाईल कव्हर प्रिंटिंग बिझनेसचे बेनिफिट

– आपण मोबाइल कव्हरचा मोठा साठा करून ठेवू शकता, कारण त्यांची किंमत जास्त नसते

– या व्यवसायासाठी विशेष कौशल्याची गरज नसते

– चांगले डिझाईन हवे असेल तर तुम्हाला डिझायनिंगचे थोडे ज्ञान असणे आवश्यक आहे, त्यासाठी तुम्ही अनुभवी डिझायनरची ही नेमणूक करू शकता.

– ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही मार्केटमध्ये मोबाइल कव्हरला प्रचंड डिमांड आलेली आहे

– येणारा प्रत्येक नवीन मोबाइल तुमचा ग्राहक वाढवतो

– पार्ट टाईम बिझनेस म्हणूनही हे करता येते

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts