Astrology : वैदिक ज्योतिषशास्त्रात सर्व नऊ ग्रहांना विशेष महत्व आहे. व्यक्तीच्या जीवनावर ग्रहांच्या हालचालींचा खोलवर प्रभाव पडतो. तसेच कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीचा व्यक्तीच्या वागण्यावरही परिणाम होतो.
कुंडलीत ग्रहांची कमकुवत स्थिती व्यक्तीवर अनेक प्रकारे प्रभाव टाकते. जसे की, राग येणे, मनात वाईट विचार येणे तसेच ग्रह दोषाचे लक्षण देखील दिसून येतात. अशातच ग्रहांचा सेनापती मंगळ हा क्रोध, बंधू, ऊर्जा आणि शक्तीचा कारक मानला जातो. अशास्थितीत या ग्रहाची कुंडलीतील कमकुवत स्थिती व्यक्तीवर खूप परिणाम करते.
जेव्हा मंगळ कमजोर होतो तेव्हा व्यक्तीला राग येतो आणि अनेक नुकसान सहन करावे लागते. ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा कुंडलीत मंगळाची स्थिती कमजोर असते तेव्हा डोळ्यांच्या समस्या, उच्च रक्तदाब यासह आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात.
तसेच माणसाला प्रत्येक गोष्टीचा राग येतो. मांस आणि मद्य सेवन केल्यासारखे वाटते. लबाडीची, कपटाची भावना मनात निर्माण होते. व्यक्ती अहंकारी बनते. मंगळाच्या अशुभ स्थितीचा वैवाहिक जीवनावर देखील वाईट परिणाम होतो. आर्थिक अडचणी वाढतात. आदर कमी होऊ लागतो. इत्यादी…
पण तुम्ही असे काही उपाय करून तुमच्या कुंडलीतील मंगळाचा वाईट प्रभाव कमी करू शकता. आज आपण या उपायांबद्दलच बोलणार आहोत.
मंगळाचा वाईट प्रभाव टाळण्यासाठी हे उपाय करा !
-मंगळवारी हनुमानजींना चमेलीचे तेल आणि सिंदूर अर्पण करा. असे केल्याने कुंडलीत मंगळाची स्थिती मजबूत होते.
-मंगळवारी लाल रंगाचे कपडे घाला. असे केल्याने मंगल दोषापासून आराम मिळतो.
-ज्योतिष शास्त्रानुसार मंगळ ग्रहाला बलवान बनवण्यासाठी लोकांनी प्रवाळ रत्न धारण करावे.
-लाल रंगाचे कपडे, गूळ, तांबे, गहू इत्यादी गरजू आणि गरिबांना दान करा. असे केल्याने मंगळाचा वाईट प्रभाव कमी होतो.
-मंगळवारी उपवास ठेवा. “ओम क्रिम क्रं भौमय नमः” या मंत्राचा 3, 5 किंवा 7 वेळा जप करा.