लाईफस्टाईल

General Knowledge : तुम्हाला माहीत आहे का ध्वनिप्रदूषण नेमकं मोजतात कसे?

General Knowledge : सध्या वाहनांची संख्या प्रचंड वाढली असून हॉर्न वाजवण्याची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सतत आणि आवश्यकता नसताना हॉर्न वाजवल्याने गोंगाट होतो, ध्वनिप्रदूषण होते, याने आसपासच्या नागरिकांचे आरोग्य बिघडते.

पण हे ध्वनिप्रदूषण नेमकं मोजतात कसे? जगात पहिल्यांदा १९२९ रोजी आवाजाच्या पातळीचे सर्वेक्षण न्यूयॉर्क शहरात करण्यात आले. आपल्या कानांनी आपण आवाज ऐकतो, आपले कान खूपच संवेदनशील असतात. त्यामुळे आवाजाची पातळी मोजण्यासाठी आपल्याच कानांचे एक प्रतिरूप बनवले गेले.

कोणताही आवाज आपण ऐकतो तेव्हा त्या ध्वनिलहरींचा दाब आपल्या कानांच्या पडद्यावर पडतो, त्यातून उठलेल्या तरंगाचं रूपांतर विद्युत रासायनिक लहरींमध्ये होते, त्या लहरी कानांच्या पडद्यांना जोडलेल्या मज्जातंतूकडून मेंदूपर्यंत पोहोचवल्या जातात.

तिथं त्याचे विश्लेषण होऊन त्या आवाजाचा अर्थ आपल्याला कळतो… पण आवाजाची पातळी मात्र कानांच्या पडद्यावर पडणाऱ्या दाबावरच अवलंबून असते. तेव्हा कोणत्याही ध्वनिलहरींच्या एका पातळ पडद्यावर पडणाऱ्या दाबाचं मोजमाप करून त्याची पातळी निश्चित केली जाते. त्यासाठी डेसिबल हे एकक वापरतात.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts