Covishield Vaccine : जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले होते. अशास्थितीत ही महामारी टाळण्यासाठी लसीकरण सुरु करण्यात आले. कोरोना महामारीवर देशात दोन लस देण्यात आल्या पहिली म्हणजे को-व्हॅक्सिन आणि दुसरी लस कोव्हीशिल्ड. कोरोनावरील लसीमुळे अनेकांचे प्राण वाचले, पण आता मात्र कोव्हीशिल्ड लसीबाबत धक्कादायक बातम्या समोर येत आहेत.
कोव्हीशिल्ड बनवणाऱ्या कंपनी ॲस्ट्राझेनेका हीने युकेच्या न्यायालयामध्ये एक कबुली दिली आहे. कपंनीने सांगितले की, या लसीच्या वापराने दुर्लभ प्रकरणात साईड इफेक्ट होत आहे, असे धक्कादायक प्रतिज्ञापत्र न्यायालयामध्ये सादर केले आहे. कोरोना काळात भारतात 2 अब्ज लोकांचे लसीकरण झाले आहे. त्यातील 170 कोटी लोकांना कोव्हीशील्ड लस देणयात आली आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
दरम्यान, तज्ज्ञ डॉक्टरांनी लोकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन केले आहे. या लसीचे फायदे अनेक आहेत आणि तोटे खूप कमी आहेत, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे कोविशील्ड लसीबद्दल घाबरण्याची गरज नाही असे त्यांनी म्हंटले आहे. लस सुरक्षित असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. त्यांनी सांगितले आहे की, जर कोणतेही दुष्परिणाम होणार असतील तर लसीकरणानंतरच घडले असते. त्यामुळे त्यांनी कोणतीही काळजी करण्याची गरज नसल्याचे सांगितले आहे.
याबात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. एस.डी. जोशी यांनी सांगितले की, कोविड लसीनंतर एक ते सहा आठवड्यांनंतर दुष्परिणाम होतात. त्यामुळे लोकांनी घाबरण्याची गरज नाही. आतापर्यंत देशात 230 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. जर साइड इफेक्ट्स असते तर आतापर्यंत अर्ध्याहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असता. पण तसे झाले नाही, त्यामुळे घाबरू नका. असे देखील त्यांनी सांगितले आहे.