लाईफस्टाईल

Drinking Water : पाणी पिताना करू नका ‘या’ चुका, अन्यथा होऊ शकते नुकसान !

Mistakes to avoid while drinking water : निरोगी आरोग्यासाठी खाण्यापिण्याशी संबंधित काही नियमांचे पालन करणे खूप महत्वाचे ठरते. असाच एक नियम पाणी पिण्यासाठीही आहे. पण क्वचितच लोकांना या नियमाबाबत माहिती असेल, म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी याचे नियम घेऊन आलो आहोत, जेणेकरून तुम्हाला भविष्यात कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागणार नाही.

आता तुम्हाला पाणी पिण्यासाठी कोणते नियम आहेत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल?, तर शरीराचा सुमारे 60 टक्के भाग पाण्याने बनलेला असतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने पाणी प्यायले नाही तर तुमच्या शरीरातील अनेक क्रिया थांबू शकतात आणि तुम्ही आजारी पडू शकता. म्हणूनच आम्ही पाण्याशी संबंधित अशाच काही नियमांबद्दल माहिती घेऊन आलो आहोत.

पाणी पिताना ‘या’ चुका करू नका 

-तुम्ही तुमच्या आजूबाजूला असे अनेक लोक पाहिले असतील, जे उभे राहून पाणी पितात. कदाचित तुम्हीही असचं करत असाल. पण तुम्हाला हे माहित आहे का की आरोग्याच्या दृष्टीने असे करणे तुमच्यासाठी घातक ठरू शकते. होय, उभे राहून पाणी पिण्याच्या सवयीमुळे शरीरातील द्रव संतुलन बिघडू शकते आणि अपचन होऊ शकते. पाणी पिताना आरामात बसणे आणि हळू-हळू पाणी पिणे तुमच्यासाठी चांगले.

-जर कमी पाणी पिणे चुकीचे असेल तर जास्त पाणी पिणे देखील आरोग्यासाठी घातक आहे. तहान न लागता पाणी प्यायल्याने ओव्हरहायड्रेशन आणि पाण्याची नशा होऊ शकते. इतकेच नाही तर जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील सोडियमची पातळीही कमी होऊ शकते. म्हणूनच योग्य प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

-उन्हाळ्यात तुम्हाला थंड पाणी प्यावेसे वाटू शकते. परंतु यामुळे तुमच्या पचनक्रियेला अडथळा निर्माण होऊन स्नायूंमध्ये क्रॅम्प होऊ शकतात. ही समस्या टाळण्यासाठी नेहमी कोमट पाणी पिण्यास महत्व द्यावे.

-वारंवार पाणी पिण्याने तुमची पचनक्रिया बिघडू शकते, ज्यामुळे व्यक्तीला अपचन आणि पोट फुगण्याची समस्या होऊ शकते. याशिवाय लवकर पाणी पिल्याने किडनी आणि मूत्राशयावरही वाईट परिणाम होतो. ही समस्या टाळण्यासाठी नेहमी थोडे-थोडे पाणी प्यावे.

-अन्न खाताना पाण्याचे सेवन करत राहिल्यास पोटातील आम्ल पातळ होते, त्यामुळे अन्न पचण्यास त्रास होतो. असे केल्याने पचनक्रियेवरही परिणाम होतो, म्हणूनच जेवणाच्या काही वेळाने पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

Renuka Pawar

Recent Posts