लाईफस्टाईल

Dry Fruits Benefits : ड्राय फ्रुट्स महिलांसाठी खूप फायदेशीर, गरोदरपणात…

Dry Fruits Benefits : ड्राय फ्रुट आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. विशेषत: महिलांनी त्यांच्या आहारात समावेश करावा. ड्राय फ्रूट्समध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, निरोगी चरबी आणि फायबर यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात. तसेच त्यात फायटोस्टेरॉल आणि व्हिटॅमिन-ई सारखे पोषक घटक देखील असतात. हे पोषक तत्व हृदयाच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. तसे ड्राय फ्रूट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळतात. त्याचे सेवन केल्याने पचनशक्ती देखील मजबूत होते. हे महिलांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, आजच्या या लेखात आपण ड्राय फ्रूट्सचे सेवन महिलांसाठी किती फायदेशीर आहे हे जाणून घेणार आहोत, चला तर मग…

अंजीर

-अंजीर खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. प्रसूतीनंतरचे वजन कमी करण्यासाठी महिला अंजीरचे सेवन करू शकतात. अंजीरमध्ये भरपूर फायबर असते. याचे सेवन केल्याने वारंवार भूक लागत नाही, तसेच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते आणि साखरेची लालसाही नियंत्रित ठेवण्यास मदत होते. अंजीर खाल्ल्याने शरीर दिवसभर ऊर्जावान राहते आणि अशक्तपणा जाणवत नाही.

खजूर

-गर्भधारणेसाठी आवश्यक मानले जाणारे पोषक, जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स खजूरमध्ये आढळतात. खजूरमध्ये फोलेट असते. न जन्मलेल्या मुलाच्या आरोग्यासाठी फोलेटचे सेवन खूप फायदेशीर मानले आहे. खजूरमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम आढळते. यामध्ये आहारातील फायबर देखील आढळते, जे गरोदरपणात कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. तुम्ही एका दिवसात 1 ते 2 खजूर खाऊ शकता.

मनुका

-मनुका खाल्ल्याने अशक्तपणा दूर होतो. मनुक्यामध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते. गरोदरपणात एनीमिया ही एक सामान्य समस्या बाब आहे, त्यामुळे सुरक्षित प्रसूतीमध्ये अडथळा निर्माण होत आहे. मनुके रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी 3 ते 4 मनुके खा. मनुका मध्ये फॉलिक ऍसिड आढळते, जे गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीत गर्भाच्या विकासास मदत करते.

अक्रोड

-मासिक पाळी, गर्भधारणा आणि रजोनिवृत्ती दरम्यान महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल होतात. त्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी महिलांनी अक्रोड खावे. अक्रोड कच्चे खाण्याऐवजी तुम्ही रात्रभर भिजवून सकाळी खाऊ शकता. 1 दिवसात 2 ते 3 अक्रोड खाणे सुरक्षित आहे.

बदाम

-हाडे निरोगी ठेवण्यासाठी गरोदर महिलांनी आपल्या आहारात बदामाचा समावेश करावा. बदामामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आढळते. हाडे निरोगी ठेवण्यासाठी बदामाचे सेवन करणे फायदेशीर आहे. गर्भधारणेदरम्यान किंवा रजोनिवृत्ती दरम्यान महिलांसाठी पुरेसे कॅल्शियम घेणे आवश्यक मानले जाते. भिजवलेले बदाम सकाळी 3 ते 4 या प्रमाणात खावेत.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts