Dry Fruits for Strong Bones : वाढत्या वयाबरोबर लोकांना हाडे आणि सांधेदुखीचा त्रास सहन करावा लागतो. विशेषत: महिलांना याचा अधिक त्रास होतो. अशा परिस्थितीत, लोक अनेकदा कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी पूरक आहार घेण्यास सुरुवात करतात. तुमची इच्छा असेल तर तुम्ही नैसर्गिक पद्धतीनेही तुमची हाडे मजबूत करू शकता. ड्राय फ्रुट हाडांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. ड्रायफ्रुट्सचे नियमित सेवन केल्यास हाडे मजबूत होतात. ड्राय फ्रुट खाल्ल्याने सांधे आणि हाडांच्या दुखण्यापासूनही आराम मिळतो. आज आम्ही तुम्हाला ड्राय फ्रुट खाण्याचेच फायदे सांगणार आहोत.
बदाम
हाडे मजबूत करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात बदामाचा समावेश करू शकता. बदामामध्ये कॅल्शियम, मॅंगनीज, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यांसारखे घटक आढळतात. ज्यामुळे हाडे मजबूत होतात. जर तुम्हाला हाडे आणि सांधे दुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात बदामाचा समावेश करू शकता. रोज बदाम खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि शरीरही निरोगी राहते.
काजू
हाडे मजबूत करण्यासाठी तुम्ही काजूचे देखील सेवन देखील करू शकता. काजूमुळे हाडे आणि सांधेदुखी कमी होण्यास मदत होते. काजूमध्ये कॅल्शियम, फोलेट आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात आढळतात. जर तुम्ही रोज काजूचे सेवन केले तर त्यामुळे तुमची हाडे मजबूत होतात. काजूचे दूध पिणे हाडांसाठी फायदेशीर मानले जाते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही भिजवलेले काजू देखील खाऊ शकता.
खजूर
खजूर देखील हाडे मजबूत करण्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. खजूरमध्ये भरपूर पोषक असतात. यामध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, मॅंगनीज, कॉपर आणि सेलेनियम सारखे घटक आढळतात, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. तुमची हाडे मजबूत करण्यासाठी तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात खजूर समाविष्ट करू शकता. यासाठी तुम्ही 5-6 खजूर घ्या आणि त्यांना रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी खजूर खा. यामुळे तुमची हाडे आणि स्नायू मजबूत होतील.
अक्रोड
अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिडचे प्रमाण जास्त असते. याशिवाय अक्रोडमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी6 आणि फॉस्फरस देखील असतात. अक्रोडाचे नियमित सेवन केल्यास हाडांचे आरोग्य सुधारते. यासाठी 1-2 अक्रोडाचे दाणे घ्या. रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी अक्रोडाचे दाणे खा. यामुळे तुमची हाडे आणि मेंदू सुधारेल.
अंजीर
अंजीर हे फळ आहे. पण जेव्हा ते सुकते तेव्हा सुक्या मेव्याच्या यादीत त्याचा समावेश होतो. कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसह अनेक पोषक तत्वे अंजीरमध्ये आढळतात. हाडे मजबूत करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात अंजीर समाविष्ट करू शकता. यासाठी तुम्ही २-३ अंजीर घ्या. त्यांना पाण्यात भिजत ठेवा. सकाळी याचे सेवन करा, तुम्हाला खूप फायदे होतील. तुम्हाला हवे असल्यास दुधात भिजवलेले अंजीरही खाऊ शकता.