लाईफस्टाईल

Dry Fruits Laddu : सकाळचा उत्तम नाश्ता म्हणजे ‘ड्रायफ्रूट लाडू; जाणून घ्या फायदे आणि बनवण्याची पद्धत !

Dry Fruits Laddu : आपण सर्वजण जाणतो ड्राय फ्रुट्स आपल्या आरोग्यासाठी किती फायद्याचे आहे. ड्राय फ्रुट्स निरोगी राहण्यासाठी खूप फायद्याचे आहे. ड्राय फ्रुट्स अनेक प्रकारच्या पौष्टिक घटकांनी समृद्ध असतात, त्याच्या सेवनाने तुमच्या शरीराला शक्ती मिळते. त्यामुळे लोक सहसा सकाळी थेट ड्रायफ्रूट्स खाणे पसंत करतात.

ड्राय फ्रुट सगळेच खातात पण तुम्ही कधी सुक्या मेव्यापासून बनवलेले लाडू चाखले आहेत का? ड्राय फ्रुट लाडू तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात, आज आपण शुगर फ्री ड्रायफ्रुट्स लाडूचे फायदे तसेच ते बनवण्याची पद्धत जाणून घेणार आहोत.

ड्राय फ्रुट लाडू खाण्याची फायदे :-

1. दररोज ड्रायफ्रूट लाडू खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि मौसमी आजारांपासून तुमचे संरक्षण होते.

2. बदाम, अक्रोड, अंजीर, खजूर यांसारख्या गोष्टी सामान्यतः ड्रायफ्रुट्स लाडूमध्ये वापरल्या जातात ज्यामुळे आपल्या शरीराला ताकद मिळते आणि स्नायू मजबूत होतात.

3. ड्रायफ्रूट लाडू बनवण्यासाठी गुळाचा वापर केला जातो आणि गुळात भरपूर लोह असते. हिवाळ्यात गुळाचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. आपले शरीर उबदार ठेवण्यासोबतच ते अ‍ॅनिमियालाही प्रतिबंध करू शकते.

4. ड्राय फ्रुट लाडूमध्ये डिंक वापरल्यास आरोग्य सुधारते. रोगांशी लढण्याची ताकद मिळते आणि स्नायू मजबूत होतात.

ड्रायफ्रुट्स लाडू बनवण्यासाठी साहित्य :-

-1 कप चिरलेला बदाम
-1 कप चिरलेला काजू
-अर्धा कप चिरलेला पिस्ता
-खरबूज बिया 2 चमचे
-खजुराचे तुकडे दीड कप सीडलेस
-वेलची पावडर
-तूप 1 ते 2 चमचे

ड्रायफ्रुट्स लाडू कसे बनवायचे?

-ड्रायफ्रुट्स लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम नॉन-स्टिक पॅनमध्ये एक चमचा तूप घाला.
-नंतर खजूर सोडून सर्व ड्रायफ्रुट्स हलके तळून घ्या.
-यानंतर खजूर मिक्सरमध्ये बारीक करून गुळगुळीत पेस्ट बनवा.
-नंतर एका कढईत खजुराची पेस्ट टाका आणि सुमारे 2-4 मिनिटे हलवत राहा.
-यानंतर त्यात उरलेले तूप घालून चांगले मिक्स करा.
-नंतर सुक्या मेव्यामध्ये हिरवी वेलची पावडर मिसळून लाडूंचे मिश्रण बनवा.
-यानंतर हे मिश्रण काही वेळ थंड होण्यासाठी राहू द्या.
-नंतर या मिश्रणाचे छोटे लाडू बनवून बाजूला ठेवा.
-आता तुमचे पौष्टिक आणि चविष्ट ड्रायफ्रुट्स लाडू तयार आहेत.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts