Rahu Ketu : सनातन धर्मात राहू आणि केतू यांना मायावी ग्रह मानले जाते. हे दोन्ही असे ग्रह आहेत ज्यांचा वाईट प्रभाव मानवी जीवनावर पडला तर त्यांचे आयुष्य उद्वस्थ होते. तर यांच्या चांगल्या प्रभावाने व्यक्ती रातोरात श्रीमंत बनू शकतो.
या दोन ग्रहांची खास गोष्ट म्हणजे ते हळूहळू एक राशीतून दुसऱ्या राशीत प्रवास करतात. दरम्यान, दोन्ही ग्रहांचे संक्रमण गेल्या वर्षी म्हणजेच ऑक्टोबर 2023 मध्ये झाले होते. त्या संक्रमणानंतर राहू मीन राशीत तर केतू कन्या राशीत बसला आहे.
आता पुन्हा एकदा दोन्ही ग्रहांच्या संक्रमणाची वेळ जवळ आली आहे, जेव्हा 2025 मध्ये राहू कुंभ राशीत आणि केतू सिंह राशीत विराजमान होईल. या संक्रमणानंतर अनेक राशींवर वाईट परिणाम दिसून येणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी पाहूया…
कर्क
राहू आणि केतू या दोन्ही ग्रहांचे संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी फारसे शुभ राहणार नाही. या प्रवासादरम्यान तुम्हाला ऑफिसमध्ये तणावाचा सामना करावा लागू शकतो. या काळात तुमच्या सहकाऱ्यांसोबत वादविवाद किंवा वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. एवढेच नाही तर तुम्हाला आर्थिक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. या काळात कर्क राशीच्या लोकांनी अनावश्यक ताण घेणे टाळावे लागेल.
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठीही राहू केतूचे संक्रमण लाभदायक ठरणार नाही. या काळात त्यांना मोठ्या प्रमाणात वित्तहानी होऊ शकते. याचा थेट परिणाम केवळ आर्थिक स्थितीवरच होणार नाही तर मानसिक स्थितीवरही परिणाम होऊ शकतो. या राशीच्या लोकांचे जोडीदारासोबत तणावही असू शकतो. आरोग्यही बिघडण्याची शक्यता आहे, त्यामुळे अगोदरच सावध राहण्याची गरज आहे.
वृषभ
राहू आणि केतूचे संक्रमण वृषभ राशीच्या लोकांसाठी तणावपूर्ण असेल. आर्थिकदृष्ट्या वृषभ राशीच्या लोकांना या काळात अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. त्यांना वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागेलच, शिवाय त्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होईल. तुम्ही तुमच्या मुलांकडून वाईट बातमी ऐकू शकता.