लाईफस्टाईल

iQOO 10 Pro : 200W फास्ट चार्जिंग असलेला जगातील पहिला स्मार्टफोन लवकरच होणार लॉन्च; 5 मिनिटांत बॅटरी फुल…!

iQOO : iQOO लवकरच त्यांचा iQOO 10 सिरीज स्‍मार्टफोन लॉन्‍च करणार आहे. यामध्ये व्हॅनिला iQOO 10 (vanilla iQoo 10) आणि iQOO 10 Pro (iQoo 10 Pro) यांचा समावेश असणार आहे. या दोन स्मार्ट फोनबात 19 जुलै 2022 रोजी अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

या स्मार्टफोन्सच्या लॉन्चच्या आधी, कंपनीने पुष्टी केली आहे की iQOO 10 Pro 200W फास्ट चार्जिंग सपोर्टसह लॉन्च केला जाणार आहे. यासह कंपनीने आतापर्यंतचा सर्वात फास्ट चार्जिंग स्मार्टफोन बनला आहे. याशिवाय, iQOO 10 स्मार्टफोन केवळ 120W फास्ट चार्जिंग सपोर्टसह लॉन्च केला जाऊ शकतो.

iQOO फंक्शन

-200W फास्ट चार्जिंग
-50MP फ्रंट कॅमेरा
-16GB रॅम
-Android 12 OS

200W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेला जगातील पहिला स्मार्टफोन

वरील पोस्टर 200W फास्ट चार्जिंग सपोर्टसह iQOO 10 Pro ची पुष्टी करते. या स्मार्टफोनला 0 पासून 63 टक्के चार्ज होण्यासाठी सुमारे 5 मिनिटे लागतील. तथापि, नवीन 200W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाद्वारे डिव्हाइसला 0 ते 100 टक्के चार्ज करण्यासाठी किती वेळ लागेल याची माहिती सध्या उघड झालेली नाही.

अलीकडील अहवालात असे दिसून आले आहे की iQOO 10 मध्ये मॉडेल क्रमांक V2217A आहे, तर Pro मॉडेलमध्ये V2218A मॉडेल आहे. हा डिवाइस 3C च्या डेटाबेसमध्ये देखील आले आहेत. व्हॅनिला मॉडेलच्या 3C सूचीवरून असे दिसून येते की ते 120W चार्जरपेक्षा लेस असेल. दुसरीकडे, प्रो मॉडेलचे 3C प्रमाणन सूचित करते की, पॉवर एडॉप्टर 20V/10A (200W) कमाल चार्जिंग गती देऊ शकतो.

iQOO 10 Pro चे स्पेसिफिकेशन

iQOO 10 Pro नुकतेच चीनमधील TENAA प्राधिकरणाने प्रमाणित केले आहे. रिपोर्ट्सनुसार, 6.78-इंच AMOLED डिस्प्लेसह येईल. यात क्वाड एचडी रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट मिळेल. याशिवाय हा स्मार्टफोन iQOO UI सह Android 12 OS वर चालेल. त्याचबरोबर यामध्ये अल्ट्रासोनिक इन-स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर देखील देण्यात येणार आहे.

iQOO 10 Pro ला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यामध्ये 50MP फ्रंट कॅमेरा, 50MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा, 14.6MP टेलिफोटो लेन्सचा समावेश असेल. याशिवाय फ्रंटमध्ये 16MP सेल्फी कॅमेरा दिला जाईल, iQOO 10 Pro मध्ये ड्युअल-टोन डिझाइन असेल.

या iQOO स्मार्टफोनमध्ये 4,550mAh बॅटरी मिळू शकते. माहितीनुसार, 200W चार्जिंग सपोर्ट व्यतिरिक्त, हे 65W वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करू शकते. याला स्नॅपड्रॅगन 8 जनरल 1 चिपसेटमधून पॉवर मिळेल. स्टोरेज बद्दल बोलायचे झाले तर यात 16GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज मिळू शकते.

आम् iQOO 10 आणि iQOO 10 Pro सध्या चीनमध्ये लॉन्च होणार आहे. पण भारतातील लॉन्चबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts