लाईफस्टाईल

Fitness Tips : तुम्ही पण तासन्तास खुर्चीवर बसता का?; जाणून घ्या यामुळे होणारे 5 गंभीर नुकसान !

Side Effects Of Sitting For Prolonged Hours : सध्या डेस्क जॉब करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. लोकांना एकाच ठिकाणी तासनतास बसून काम करावे लागते. पण, एका जागी तासनतास बसून काम केल्यामुळे अनेक प्रकारचे आजारही जडत आहेत, हे तुम्हाला माहीत आहे का? एका अहवालानुसार, “जे लोक जास्त वेळ बसून काम करतात त्यांच्यामध्ये लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, उच्च रक्तातील साखरेसारख्या अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो.” या लेखात आपण एका जागी उशिरा पर्यंत बसल्याने होणाऱ्या आजारांबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.

पाठदुखी

जेव्हा तुम्ही एका जागी तासनतास बसता आणि कोणतीही शारीरिक हालचाल करत नाही, त्यामुळे पाठदुखी वाढते. तसेच पोटाच्या समस्या वाढतात, खरं तर, जेव्हा शारीरिक हालचाली कमी होतात तेव्हा स्नायू आणि हाडे कडक होतात. या कारणास्तव, जेव्हाही तुम्ही कोणतेही जड काम सुरू करता तेव्हा पाठ किंवा कंबरदुखी वाढू लागते.

लठ्ठपणा

तासन्तास बसून राहिल्याने लोक लठ्ठ होतात. हेल्थलाइनमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखानेही पुष्टी केली आहे की जे लोक तासन्तास खुर्चीवर बसून काम करतात, त्यांचे वजन वेगाने वाढते.

मधुमेहाचा धोका

जे लोक शारीरिकदृष्ट्या सक्रिय असतात त्यांना बसून काम करणाऱ्यांपेक्षा मधुमेहाचा धोका कमी असतो. बसून काम करणाऱ्या लोकांमध्ये मधुमेहाचा धोका 112 टक्क्यांनी वाढतो.

खांदे दुखी

खुर्चीवर तासनतास बसल्याने तुमच्या कंबर आणि पाठीवर जसा परिणाम होतो, तसाच परिणाम तुमच्या मान आणि खांद्यावरही होतो. खरंतर तासनतास बसून राहिल्यामुळे पाठीचा पोस्चर बिघडतो. अशा स्थितीत खांदे आणि मान समोरच्या दिशेने वाकलेली राहतात, हे विशेषतः अशा लोकांच्या बाबतीत घडते जे बहुतेक वेळा संगणकाच्या स्क्रीनकडे वाकलेले असतात.

रक्त प्रवाहामध्ये अडथळा निर्माण होतो

जास्त वेळ बसल्याने पायांमध्ये रक्त साचू शकते. शरीरातील रक्त परिसंचरण प्रभावित होऊ शकते. यामुळे वैरिकास व्हेन्स किंवा स्पायडर व्हेन्सची समस्या उद्भवू शकते. तथापि, ही स्वतःच एक मोठी समस्या नाही. पण व्हेरिकोज व्हेन्समुळे शिरा सुजतात आणि चालायला त्रास होतो. यामुळे शिरा देखील दिसतात.

डेस्क जॉब असेल तर या गोष्टी पाळा

-दर ३० मिनिटांनी तुमच्या खुर्चीवरून उठून फिरा.
-फोनवर बोलत असताना किंवा टीव्ही पाहताना बसण्याऐवजी उभे राहण्याला महत्त्व द्या.
-तुम्ही ज्या खुर्चीवर काम करता त्या खुर्चीची गुणवत्ता तपासा. तुटलेल्या खुर्चीवर बसल्याने वेदना वाढू शकतात.
-शारीरिक क्रियाकलाप वाढवा. एखाद्याला भेटायचे असेल तर चालून जा, गाडीचा वापर करू नका.

Renuka Pawar

Recent Posts