Mangal Gochar 2024 : ग्रहांचा सेनापती मंगळ याला “लाल ग्रह” म्हणूनही ओळखले जाते. मंगळ ग्रह हा मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह आहे. मंगळ शौर्य, धैर्य, सामर्थ्य, ऊर्जा, भावंड, खेळकरपणा यांचा कारक आहे. एखाद्याच्या कुंडलीत जर मंगळ मजबूत स्थितीत असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनात यश येते.
तसेच पद आणि प्रतिष्ठाही वाढते. व्यक्ती धैर्यवान, निर्भय आणि उत्साही बनते. अशातच मंगळ 1 जून रोजी मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे अतिशय शुभ योग तयार होत आहे. मेष राशीतील मंगळाचा प्रवेश अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणेल. कोणत्या आहेत त्या राशी चला पाहूया…
मेष
मंगळाचे हे संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नसेल. विद्यार्थ्यांना या काळात खूप फायदा होईल, त्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकेल. विज्ञान, ज्योतिष, स्थावर मालमत्ता आणि मालमत्तेशी संबंधित लोकांना काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. परदेशात जाण्याची शक्यता आहे. व्यवसायात लाभ होईल.
धनु
मंगळाचे हे संक्रमण धनु राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. आयात-निर्यात व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा काळ अनुकूल राहील. फायदा होऊ शकतो. परदेशात शिक्षणासाठी जाण्याचे स्वप्न पूर्ण होईल. भाऊ-बहिणींचे सहकार्य मिळेल. कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल.
कुंभ
या राशीच्या लोकांवर सुद्धा मंगळ दयाळू राहील. व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि कुठेही गुंतवणूक करण्यासाठी हा शुभ काळ आहे. कोर्ट केसमधून यश मिळू शकते. नोकरदारांना प्रमोशन मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ शुभ आहे. संशोधनाशी संबंधित लोकांना परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. पत्नीच्या तब्येतीची काळजी घेण्याची गरज आहे.
मीन
मेष राशीतील मंगळाचे हे संक्रमण मीन राशीच्या लोकांसाठी यशाचे दरवाजे उघडेल. तुम्हाला तुमच्या आवडीचे काम मिळेल. कार्यक्षेत्रात पदोन्नतीचे योग येतील आणि शत्रूंचा नाश होईल. परदेशात जाण्याची संधी मिळू शकते.