Ginger Water : भारतातील प्रत्येक घरात आल्याचा वापर केला जातो. अगदी सकाळच्या चहा पासून ते जेवणापर्यंत आल्याचा वापर केला जातो. आले शारीरिक आरोग्यासाठी एक अद्भुत औषधी वनस्पती किंवा मसाला आहे. याचे नियमित सेवन केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. पण बरेच लोक सकाळी रिकाम्या पोटी पाण्यात आले उकळतात, ते गाळून सेवन करतात अशातच त्यांना एक प्रश्न खूप सतावतो, तो म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी आल्याचे पाणी पिणे योग्य आहे का? ते पूर्णपणे सुरक्षित आहे का?
अदरक गरम असल्याने अनेकजण त्याचे सेवन करणे बंद करतात आणि त्याचे सेवन केल्याने नुकसान होऊ शकते. पण खरंच असं आहे का? आज आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत. चला तर मग…
आल्याचे पाणी पिणे सुरक्षित आहे का?
आल्याचे पाणी सकाळी रिकाम्या पोटी सेवन केले जाऊ शकते. यामध्ये धोकादायक असे काहीही नाही. फक्त लक्षात घ्या तुम्ही ते जास्त प्रमाणात सेवन करणे टाळावे, कारण हे खरे आहे की आल्याचा स्वभाव खूप उष्ण असतो. परंतु जर तुम्ही अद्रकाचे पाणी मर्यादित प्रमाणात सेवन केले तर ते पूर्णपणे सुरक्षित आहे. उलट, हे आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे.
कारण, अदरक अँटीऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्मांनी समृद्ध आहे. याचे नियमित सेवन आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. आल्याचे पाणी हे त्याचे आरोग्य फायदे मिळवण्याचा एक सोपा आणि अतिशय प्रभावी मार्ग आहे. आल्याचे पाणी तुमच्या चहा आणि कॉफीपेक्षा जास्त आरोग्यदायी पर्याय ठरू शकते. आल्याचे पाणी पिण्याचे अनेक फायदे पुढीलप्रमाणे आहेत.
आल्याचे पाणी पिण्याचे फायदे :-
-आल्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील सूज दूर होण्यास मदत होते.
-याचे सेवन केल्याने चयापचय वाढतो.
-आल्याच्या पाण्याने पचनक्रिया सुधारते.
-याचे नियमित सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
-कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास उपयुक्त देखील हे पाणी उपयुक्त आहे.
-रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
-उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी देखील हे फायदेशीर आहे.