लाईफस्टाईल

खुशखबर ! iPhone 12 मिळतोय फक्त 32,799 रुपयांत, कुठे व कसा ? पहा..

iPhone 12 Discount: जर तुम्हाला आयफोन 12 कमी किंमतीत खरेदी करायचा असेल तर तो Amazon-Flipkart वरून स्वस्त किंमतीत खरेदी करता येईल. खरं तर एक वेबसाईट आहे जी आयफोन 12 वर शानदार ऑफर्स देते.

आज आम्ही तुम्हाला या वेबसाईटबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत. चला जाणून घेऊयात –

ही ऑफर कोणत्या वेबसाईटवर उपलब्ध आहे?

ग्राहकांना Cashify नावाच्या वेबसाईटवर ही ऑफर मिळू शकते. खरं तर ही वेबसाइट जुन्या स्मार्टफोनच्या खरेदी-विक्रीसाठी काम करते. याशिवाय रीफर्बिश्ड केलेल्या प्रोडक्ट्सवर डील देखील देते. रीफर्बिश्ड प्रोडक्ट्स हे कमीतकमी फाउलट असलेले मॉडेल असतात की जे दुरुस्त करून विक्री केले जातात.

या वेबसाईटवर स्मार्टफोनही विकले जातात आणि आता त्यात iPhone 12 चाही समावेश करण्यात आला आहे. Apple iPhone 12 – Refurbished Good, 4 GB / 64 GB, Black व्हेरियंट हे अतिशय कमी किमतीत खरेदी करता येते. या वेबसाइटवर हे केवळ 32,799 रुपयांना विकले जात असून त्याची वास्तविक किंमत 57,299 रुपये आहे. या खरेदीवर युजर्स 24,500 रुपयांपर्यंत बचत करू शकतात.

सॉफ्टवेयर व परफॉर्मेंस

आयफोन 12 कंपनीच्या लेटेस्ट आयओएस 14 ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करतो. तुम्ही अँड्रॉइड युजर असाल तरी तुम्हाला ते वापरण्यात कोणतीही अडचण येणार नाही. नवीन ऑपरेटिंग सिस्टीमचे बॅक टॅप फीचर आश्चर्यकारक आहे.

यामध्ये तुम्हाला डबल टॅप आणि ट्रिपल टॅपचा पर्याय मिळेल, ज्यावर तुम्ही तुमच्या आवडत्या सेटिंग्ज सेट करू शकता. हा स्मार्टफोन नवीन A14 बायोनिक प्रोसेसरने सुसज्ज आहे. परफॉर्मन्सच्या बाबतीत तर जबरदस्त आहे. आयफोन 12 हा सर्वात वेगवान स्मार्टफोन आहे.

याद्वारे तुम्ही हेवी गेमिंग किंवा इतर कोणतेही काम विनाअडथळा करू शकता. विशेष म्हणजे अॅपलने हा 5G कनेक्टिव्हिटी असलेला आयफोन आणलेला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts