PM किसान सन्मान योजना ही योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली. अशाप्रकारे ही योजना सुरू होऊन तीन वर्षांहून अधिक काळ लोटला असून आतापर्यंत कोट्यवधी शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. (good news to farmers)
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Yojana) 11व्या हप्त्याचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत. अशा परिस्थितीत सरकार पैसे ट्रान्सफर करून शेतकऱ्यांना खुशखबर देणार आहे.
तुम्ही अद्याप या योजनेत नोंदणी केली नसेल, तर ती त्वरित पूर्ण करा. या योजनेद्वारे केंद्र सरकार दरवर्षी देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची रक्कम हस्तांतरित करते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत होते.
सरकारने आतापर्यंत पीएम किसान योजनेचे 10 हप्ते हस्तांतरित केले आहेत. आता शेतकरी पुढच्या म्हणजे 11व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याचे पैसे 1 जानेवारी 2022 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आले. देशातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपयांचा हप्ता वर्ग करण्यात आला.
ही योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली. अशाप्रकारे ही योजना सुरू होऊन तीन वर्षांहून अधिक काळ लोटला असून आतापर्यंत कोट्यवधी शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला आहे.
या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये जमा केले जातात. दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये एकूण सहा हजार रुपये वर्ग केले जातात.
या योजनेचा पहिला हप्ता १ एप्रिल ते ३१ जुलै दरम्यान येतो. त्याच वेळी, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान हस्तांतरित केला जातो.
याशिवाय तिसऱ्या हप्त्याचे पैसे १ डिसेंबर ते ३१ मार्च दरम्यान ट्रान्सफर केले जातात. त्यानुसार एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यात 11 हप्त्याची रक्कम जमा करता येणार आहे.
तुमच्या अर्जाची स्थिती कशी तपासायची –
pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट द्या
वेबसाइटच्या उजव्या बाजूला ‘फार्मर्स कॉर्नर’ वर क्लिक करा
आता पर्यायातून लाभार्थी स्थितीवर क्लिक करा
स्थिती तपासण्यासाठी, तुम्हाला काही तपशील जसे की आधार क्रमांक, बँक खाते आणि मोबाइल नंबर प्रविष्ट करणे आवश्यक आहे
ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचे नाव यादीत आहे की नाही याची माहिती मिळू शकते.