Grah Gochar 2023: नवीन वर्षाचा पहिला महिना देखील संपत आला आहे. काही दिवसानंतर आपण सर्वजण फेब्रुवारी महिन्यात एन्ट्री करणार आहे. या फेब्रुवारी महिन्यात आम्ही तुम्हाला सांगतो अनेक मोठे ग्रह आपली चाल बदलणार आहे. यामुळे या बदलाचा प्रभाव अनेक लोकांवर देखील दिसून येणार आहे.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या फेब्रुवारी 2023 मध्ये सूर्य, बुध, शुक्र आणि नेपच्यून हे मोठे ग्रह आपली चाल बदलणार आहे. 7 फेब्रुवारी रोजी बुध ग्रहांचा राजकुमार मकर राशीत प्रवेश होणार आहे, ज्यामुळे बुधादित्य योग तयार होईल. 27 फेब्रुवारीला तो कुंभ राशीत प्रवेश करेल. येथे सूर्य आणि शनि सोबत त्याचा त्रिग्रही आणि बुधादित्य योग तयार होईल.
13 फेब्रुवारी रोजी भगवान सूर्य शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करतील. 15 फेब्रुवारीला शुक्र मीन राशीत प्रवेश करेल. 18 फेब्रुवारी रोजी नेपच्यून ग्रह मीन राशीत प्रवेश करेल. येथे त्याची भेट शुक्र आणि गुरूशी होईल. फेब्रुवारी महिना अनेक राशींसाठी नशिबाची दारे उघडेल. आता जाणून घ्या कोणत्या राशीच्या लोकांना फेब्रुवारी महिन्यात खूप फायदा होईल.
तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी ग्रहांचे संक्रमण चांगले राहील. जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल आणि नातेही घट्ट होईल. व्यवसायात प्रगती होईल आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांसह धार्मिक स्थळी जाऊ शकता. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि आदर वाढेल. ज्यांना परदेशात जायचे आहे, त्यांची इच्छा पूर्ण होईल.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना शुभ राहील. या राशीमध्ये सूर्य, शुक्र आणि बुध ग्रह असतील. यामुळे जीवनात सकारात्मकता येईल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि सरकारी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कुटुंबीयांसह धार्मिक यात्रेला जाऊ शकता. ग्रहांच्या प्रभावामुळे उर्जेने परिपूर्ण असेल. निर्णय घेण्याची क्षमताही चांगली राहील. जीवनसाथीसोबतचे संबंध सुधारतील.
मेष
मेष राशीच्या लोकांना ग्रहांच्या राशी बदलल्याने खूप फायदा होईल. पैसे कुठे अडकले असतील तर तेही लवकर वसूल होतील. याशिवाय केलेल्या गुंतवणुकीचाही फायदा होईल. आई-वडील तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील आणि त्यांच्या मदतीने सरकारी कामेही पूर्ण होतील. यांच्यासाठी व्यवसाय सुरू करण्यासाठी हा चांगला काळ असणार आहे. मित्रमंडळींचे पूर्ण सहकार्य मिळेल आणि कुठेतरी सहलीला जाण्याचा बेत आखता येईल. शुक्राच्या राशी परिवर्तनाने तुम्हाला समस्यांपासून मुक्ती मिळेल आणि भौतिक सुखसोयी मिळतील. मात्र या काळात आरोग्याची काळजी घ्या आणि तणाव टाळण्याचा प्रयत्न करा.
कर्क
चार ग्रहांच्या राशी बदलामुळे कर्क राशीच्या लोकांनाही फायदा होईल. कौटुंबिक किंवा वडिलोपार्जित मालमत्ता मिळू शकते. व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात आणि आर्थिक स्थितीही मजबूत राहील. व्यवहार करताना काळजी घ्या. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल आणि लव्ह लाईफमधील समस्या दूर होतील. सूर्याच्या प्रभावामुळे सामाजिक कार्यात सहकार्यामुळे मान-सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील. व्यावसायिकांच्या मेहनतीचा परिणाम दिसून येईल आणि अधिकारीही दयाळू असतील.
कन्या
चार ग्रहांचे संक्रमण कन्या राशीच्या लोकांसाठी भाग्यवान ठरेल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या संधी मिळतील आणि धार्मिक कार्य घरबसल्या करता येईल. व्यावसायिक बचत करू शकतील. तसेच नवीन नोकरी शोधू शकता. कोणताही कायदेशीर वाद सुरू असेल तर त्यात यश मिळू शकते. जवळच्या व्यक्तींच्या मदतीने अपूर्ण कामे पूर्ण होतील. व्यावसायिकांसाठीही हा काळ शुभ आहे. नवीन ऑर्डर मिळू शकते.
हे पण वाचा :- Nirmala Sitharaman : खूशखबर ! होणार हजारोंची बचत ; मोदी सरकार घेणार आयकरसंदर्भात ‘हा’ मोठा निर्णय , वाचा सविस्तर