Grah Gochar 2024 : जोतिषात ग्रहांच्या हालचालीला विशेष महत्व आहे. ग्रहांच्या हालचालींचा मानवी जीवनासह पृथ्वीवरही होतो. दरम्यान, 2023 प्रमाणेच 2024 मध्येही ग्रहांच्या विशेष हालचाली पाहायला मिळणार आहेत, ज्याचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 2024 हे वर्ष खूप खास असेल. नवीन वर्षात अनेक ग्रह आपल्या चाली बदलतील. या काळात ग्रहांच्या हालचालींनुसार अनेक शुभ-अशुभ योग तयार होणार आहेत.
अशातच सुमारे 1000 वर्षांनंतर नवीन वर्षात शनि, गुरू आणि राहू यांचा दुर्मिळ संयोग होणार आहे. गुरु हा ज्ञान, संपत्ती, शिक्षण, धार्मिक कार्य, संतती, संपत्ती, विवाह इत्यादींचा कारक आहे. शनि आणि राहू हे दोन्ही अशुभ ग्रह मानले जातात. दोन्ही ग्रहांची वाईट दृष्टी राजाला देखील कंगाल बनवू शकते.
2024 मध्ये राहू संपूर्ण वर्ष गुरूच्या मूळ राशीत मीन राशीत राहील. त्याच वेळी, शनी देखील आपल्या मूळ राशीत म्हणजे कुंभ राशीत राहील आणि हालचाल बदलेल. देव गुरु बृहस्पति मे 2024 पर्यंत मेष राशीत राहील. यानंतर वृषभ राशीत संक्रमण करेल. परंतु त्याची 7वी दृष्टी मीन राशीवर असेल, ज्यामध्ये राहू उपस्थित असेल. ज्योतिषशास्त्रानुसार तीन ग्रहांचा असा संयोग हजारो वर्षांनंतर होत आहे. ग्रहांच्या याच हालचालींचा फायदा काही राशींना होणार आहे, कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी पाहूया…
मीन
मीन राशीच्या लोकांना राहू आणि गुरूचा विशेष आशीर्वाद मिळेल. या काळात यश आणि आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. करिअर व्यवसायात फायदा होईल. परदेश दौऱ्याचे नियोजन होऊ शकते. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. आत्मविश्वास आणि धैर्य वाढेल.
कुंभ
या राशीच्या लोकांना पुढील वर्षी विशेष लाभ मिळतील. संपत्तीत वाढ होईल. तब्येत सुधारेल, आजारांपासून आराम मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. पदोन्नतीचे योग येतील. एकूणच येणारे वर्ष खूप खास असणार आहे.
मेष
मेष राशीच्या लोकांसाठी ग्रहांची ही जोडी उत्तम राहील. नवीन वर्षात उत्पन्नात वाढ. पद आणि प्रतिष्ठेचा लाभ मिळेल. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. बिघडलेली कामे मार्गी लागतील. कुटुंबात समृद्धी येईल. विवाहाची शक्यता राहील.