लाईफस्टाईल

Guru margi 2024 : 500 वर्षांनंतर तयार आहे ‘हा’ विशेष राजयोग, 3 राशींचे उजळेल नशीब !

Guru margi 2024 : ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रहांना महत्वाचे स्थान आहे. प्रत्येक ग्रह हा कोणत्या न कोणत्या राशीशी संबंधित आहे. म्हणूनच ग्रह जेव्हा आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा पृथ्वीसह सर्व १२ राशींवर परिणाम दिसून येतो. नऊ ग्रहांमध्ये गुरूची भूमिका महत्त्वाची मानली जाते.

बृहस्पति गुरु हा धनु आणि मीन राशीचा स्वामी आहे, तो ज्ञान, बुद्धिमत्ता, अध्यात्म, शिक्षण, संपत्ती आणि धर्माचा कारक मानला जातो. इतर ग्रहांच्या तुलनेत देव गुरुला एका राशीतून दुस-या राशीत संक्रमण होण्यासाठी सुमारे 13 महिने लागतात. म्हणूनच गुरु जेव्हा संक्रमण करतो तेव्हा त्याचा चांगला वाईट परिणाम दिसून येतो.

ज्योतिष शास्त्रानुसार सध्या गुरू मेष राशीमध्ये वक्री अवस्थेत आहे आणि 31 डिसेंबर रोजी मार्गी होणार आहे, अशा स्थितीत 500 वर्षांनंतर कुल दीपक राजयोग तयार होणार आहे, जो अमाप संपत्ती आणणारा आणि सिद्ध करेल. हा राजयोग तीन राशींसाठी फायदेशीर मानला जात आहेत. कोणत्या आहेत त्या राशी चला पाहूया.

मेष

कुलदीपक राजयोगाची निर्मिती मेष राशीच्या लोकांसाठी खूप शुभ मानली जात आहे. या राशींचा 2024 पासून सुवर्णकाळ सुरू होईल. या काळात नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तसेच उभा काळात आत्मविश्वास वाढेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन चांगले राहील. करिअर आणि व्यवसायासाठी वेळ उत्तम राहील. करिअरमध्ये प्रगती आणि व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही कोणतेही जुने कर्ज फेडू शकता. देश-विदेशात प्रवासाची शक्यता आहे.

कर्क

कुलदीपक राजयोगाची रचना कर्क राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर मानली जात आहे. या काळात नशीब पूर्ण साथ देईल. तसेच 2024 पासून बृहस्पतिचा विशेष आशीर्वाद मिळेल. हा काळ करिअर बिझनेससाठी खूप चांगला मानला आहे. या काळात कामात यश मिळू शकते. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील निर्माण होतील. या काळात धार्मिक कार्यात रस वाढेल. जीवनात सुख-समृद्धी वाढेल. नोकरदारांना बढती आणि पगारवाढीचा लाभ मिळू शकतो. विद्यार्थ्यांना वेळेचे सहकार्य मिळेल आणि परीक्षा स्पर्धेत अपेक्षित यश मिळू शकेल.

सिंह

कुलदीपक राजयोगाची निर्मिती स्थानिकांसाठी खूप खास मानली जात आहे. या काळात प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. या काळात नशीब तुमच्या पाठीशी असेल. या काळात तुम्ही परदेश दौऱ्यावर देखील जाऊ शकता. या काळात गुरूंचे आशीर्वाद मिळतील. जीवनात सुख-समृद्धी वाढेल. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळू शकतात.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts