Guru Nakshatra Gochar : ज्योतिषशास्त्रात गुरु हा ज्ञान, शिक्षण, भाग्य, अध्यात्म, संतती, संपत्ती, विवाह, धार्मिक कार्य, संपत्ती आणि दान यांचा कारक मानला जातो. म्हणूनच गुरूच्या हालचालीला देखील विशेष महत्व आहे. ज्यांच्या कुंडलीत गुरूची स्थिती बलवान असते त्यांना धनाची प्राप्ती तसेच अनेक फायदे होतात.
दरम्यान, 6 एप्रिल रोजी दुपारी 3:55 वाजता गुरु आपली रास बदलणार आहे. गुरु शतभिषा नक्षत्रातून भाद्रपद नक्षत्रात संक्रमण करेल. या नक्षत्र संक्रमणाचा शुभ प्रभाव तीन राशींवर सर्वाधिक राहील.
सिंह
गुरु सिंह राशीच्या 9 व्या घरात प्रवेश करणार आहे. ज्यामुळे या राशींना नशिबाची साथ मिळणार आहे, तसेच या काळात भौतिक सुखसोयी देखील वाढणार आहेत. या काळात बिघडलेले काम मार्गी लागेल. तसेच परदेश प्रवासाची देखील शक्यता आहे. ज्याचा फायदा भविष्यात होईल.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांवर गुरु विशेष कृपा करणार आहे. मिथुन राशीच्या लोकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी हा काळ शुभ राहील. नोकरीचा शोध पूर्ण होईल. वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होतील.
कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी गुरूचा नक्षत्र बदल देखील शुभ राहील. गुरू राशीच्या दहाव्या घरात प्रवेश करेल. करिअर आणि व्यवसायात फायदा होईल. पद, प्रतिष्ठा आणि मान-सन्मानात वाढ होईल. उत्पन्न वाढेल. आर्थिक स्थिती सुधारेल.