लाईफस्टाईल

Health Benefits of Cinnamon : आरोग्यासाठी वरदान आहे दालचिनी, अशा प्रकारे करा सेवन !

Health Benefits of Cinnamon : भारतातील प्रत्येक घरात मसाल्याच्या डब्यात दालचिनी सापडतेच, दालचिनी ही पदार्थांची चव वाढवण्यासाठी वापली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का? अन्नपदार्थांची चव वाढवण्यासोबतच दालचिनी आपल्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. होय, आजच्या या लेखात आपण याच्याच फायद्यांबद्दल जाणून घेणार आहोत.

दालचिनीमध्ये अँटिऑक्सिडंट, अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल यांसारखे अनेक गुणधर्म आढळतात. जे शरीरातील अनेक आजार दूर करण्यास मदत करते. याच्या नियमित सेवनाने श्वसनाचे आजार, हृदयविकार, संधिवात, मधुमेह, बद्धकोष्ठता अशा अनेक गंभीर आजारांपासून आराम मिळू शकतो. यासोबत दालचिनी रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी आणि मेंदूला बळकट करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया दालचिनीचा वापर कसा केला जाऊ शकतो आणि ते किती फायदेशीर आहे.

दालचिनीचे पाणी

दालचिनीयुक्त पाण्याचे सेवन करणे देखील शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. यासाठी सर्वात आधी तुम्ही दालचिनी झोपण्यापूर्वी पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी प्या.

दालचिनीचा चहा

दालचिनी वापरण्यासाठी, आपण त्याचा चहा बनवू शकतो. जर तुम्ही सकाळी दालचिनीपासून बनवलेला चहा प्यायला तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यासाठी सर्वप्रथम तुम्ही अर्धा चमचा दालचिनी पावडर पाण्यात टाकून काही वेळ उकळा. त्यानंतर ते फिल्टर करून प्या.

मसाल्यांमध्ये वापरा

दालचिनीचा वापर मसाला म्हणून केला जातो. याचा वापर भाजीपाला तसेच डाळीमध्ये मसाला म्हणून करता येतो. यासोबतच तांदूळ उकळताना किंवा तयार पुलाव करतानाही दालचिनी वापरता येते.

साखर म्हणून वापरा

दालचिनीचा वापर साखर म्हणून करता येतो. कारण ते नैसर्गिकरित्या गोड असते. त्याचबरोबर साखर आरोग्यासाठीही हानिकारक आहे. म्हणून, तुम्ही साखरेऐवजी दालचिनी वापरू शकता.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts