Health Tips In Marathi :- आपल्याला किती व्यायाम करायला हवा, याविषयी काही नियम आहेत. आपल्याला आपलं वय, क्षमता आणि आरोग्य यांचा विचार करत व्यायामाची निवड करायला हवी.
जागतिक आरोग्य संघटनेने यासंबंधी काही सामान्य निर्देश दिलेले आहेत. आज याच आधारावर आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की, कोणी किती आणि कोणता व्यायाम करायला हवा . . .
मुलं आणि तरुणांनी कमीत कमी एक तास मॉडोट टू विग्रस इंटेसिटी ची ऍक्टिव्हिटी रोज करायला हवी. यामध्ये बहुतांश अरोबिक ऑक्टिव्हिटीचा समावेश असायला हवा,
म्हणजे खेळ किंवा सामान्य व्यायाम. येथे एक गोष्ट लक्षात ठेवा, विग्रस इंटेंसिटीची ऑक्टिव्हिटी योग्य प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करा.
अठरा ते चौसष्ट वयोगटासाठी : –
या वयातील स्त्री-पुरुषांना आठवड्यातून कमीत कमी एकशे पन्नास मिनिटांनी मॉडरेट इंटेसिटी अरोबिक ऍक्टिव्हिटी करायला हवी.
म्हणजे आठवड्यातील पाच दिवस जर रोज साधारण तीस मिनिटांचा मॉडरेट इंटेंसिटी ऐरोबिक ऍक्टिव्हिटी करा किंवा याऐवजी आठवड्यातील पाच दिवस पंधरा मिनिटं विग्रस अॅरोबिक ऍक्टिव्हिटी करू शकता.
याशिवाय आठवड्यातून दोन वेळा कमीत कमी स्ट्रॅंथ ऑक्टिव्हिटी करा, ज्यामध्ये सगळ्या प्रमुख मसल्स म्हणजे पाय, छाती आणि खांदे यांचा समावेश असेल.
» पासष्ट वर्षाहून अधिक : –
दर आठवड्याला एकशे पन्नास मिनिटांनी मॉडरेट इंटेंसिटी एरोबिक व्यायाम करायला हवा. म्हणजे आठवड्यातील पाच दिवस दररोज साधारण तीस मिनिटांचा मॉडरेट इंटेसिटी व्यायाम करणे फायदेशीर ठरतो.
कारण या वयात अनेक आजार मागे लागतात. शारीरिक क्षमताही कमी होते. म्हणून कोणताही व्यायाम करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
» विग्रस अॅरोबिक ऍक्टिव्हिटी : –
पळणे, पोहणे, उंच-खाली जागांवर सायकलिंग करणे, दोरीवरच्या उड्या, फुटबॉल, रग्बी, हॉकी खेळणे इत्यादी. या प्रकारच्या व्यायामात आपल्या हृदयाची धडधड आणि श्वास खुप वेगाने सुरू होतो. दम लागतो. आपल्याला तीन-चार मिनिटांमध्ये घाम येऊ लागतो.
» हे सुद्धा लक्षात ठेवा : –
दोन गोष्टी लक्षात ठेवा, सातत्य आणि संतुलित आहार. तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच सुरुवात करा. अतिउत्साही बनून व्यायामाला सुरुवात करू नका.
घाई करू नका. हळूहळू वेग आणि प्रमाण वाढवा. दुसऱ्यांची नक्कल करू नका. आपल्या शरीराला उचित आराम देण्यास विसरू नका.
» मॉडरेट एरोबिक एक्टिविटी : –
भरभर चालणे, सायकलिंग, डबल्स टेनिस, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल खेळणे ही मॉडरेट अॅरोबिक ऍक्टिव्हिटी उदाहरणे आहेत.
अशाप्रकारच्या हालचालींमध्ये हार्टरेट वाढतो आणि आपला श्वासही वेगाने चालतो. आपल्याला दहा मिनिटांमध्ये घाम येऊ लागतो.