Eat Pista to Increase Iron : ड्राय फ्रुट खाणे प्रत्येकाला आवडते, ड्राय फ्रुट आपल्या आरोग्यसाठी खूप चांगले मानले जाते, तसे ड्राय फ्रुटमध्ये बहुतेक जणांना काजू-बदाम जास्त खायला आवडते. पण तुम्हाला माहिती आहे का? काजू-बदाम सोबत आहारात जर पिस्त्याचा समावेश केला तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
फक्त 100 पिस्त्यामध्ये ग्रॅम पिस्त्यात 10 ग्रॅम फायबर, 20 ग्रॅम प्रोटीन आणि 1025 ग्रॅम पोटॅशियम असते. याशिवाय पिस्त्यांमध्ये लोह आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते. इतकंच नाही तर पिस्ता मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी 6 चाही चांगला स्रोत आहे. म्हणूनच आहारात याचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.
पिस्त्याचे नियमित सेवन केल्याने पोटाशी संबंधित अनेक आजार दूर होतात. एवढेच नाही तर पिस्ता हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. जर तुम्ही दररोज पिस्त्याचे सेवन केले तर हाडे आणि स्नायू देखील मजबूत होतात. लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही पिस्त्याचेही सेवन करू शकता. ज्या लोकांना लोहाची कमतरता भरून काढायची आहे त्यांनी नियमित पिस्त्याचे सेवन केले पाहिजे, आज आपण लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी पिस्त्याचे कसे करावे हे जाणून घेणार आहोत. चला तर मग…
-लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही पिस्ते भाजून खाऊ शकता. यासाठी पॅनमध्ये ४-५ पिस्ते भाजून घ्या. तुम्ही ते रोज संध्याकाळी स्नॅक्स म्हणून त्याचे सेवन करू शकता. जर तुम्ही रोज भाजलेले पिस्ते खाल्ले तर लोह आणि हिमोग्लोबिनची पातळी वाढते.
-जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर तुम्ही खीरमध्ये पिस्ते घालूनही त्याचे सेवन करू शकता. यासाठी दुधात तांदूळ घालून शिजवावे. नंतर त्यात बदाम, काजू, पिस्ता टाका. रोज सकाळी नाश्त्यात पिस्त्याची खीर खाल्ल्यास लोहाची कमतरता दूर होते.
-शरीरात लोहाची कमतरता असल्यास तुम्ही दुधात पिस्ते मिसळूनही त्याचे सेवन करू शकता. यासाठी एका ग्लास दुधात 4-5 पिस्ते टाका आणि आता ते चांगले उकळवा. मग तुम्ही हे दूध पिऊ शकता. तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी पिस्त्याचे दूध सेवन करू शकता. पिस्त्याचे दूध रोज प्यायल्यास लोहाची कमतरता हळूहळू दूर होते.
-दुधात मिसळून पिस्ते खाण्याची इच्छा नसेल तर भिजवलेले पिस्ते खाऊ शकता. यासाठी 5-6 पिस्ते रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. हे पिस्ते सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी खा. दररोज सकाळी भिजवलेले पिस्ते खाल्ल्याने शरीरातील सर्व पोषकद्रव्ये सहज शोषली जातात. यामुळे तुम्हाला पुरेशा प्रमाणात लोह आणि प्रथिने मिळतात.