लाईफस्टाईल

Health Tips Marathi : ‘या’ रक्तगटाच्या लोकांनी चिकन-मटण कमी खावे जाणून घ्या महत्वाची माहिती

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :-  आहार चांगला तर आरोग्य चांगले असं आपण नेहमीच म्हणत असतो. अनेकदा पौष्टिक अन्नपदार्थ खाण्याकडे आपल्या सगळ्यांचा कल असतो. मात्र हे पौष्टिक आणि महागडे अन्न खाऊनही लोकांचे आरोग्य चांगले नसते.

यामागे अनेक कारणे असू शकतात, पण एक मूळ कारण सुप्रसिद्ध निसर्गोपचारतज्ज्ञ जेडी एडैमो यांनी स्पष्ट केले आहे. की, जर एखाद्या व्यक्तीने रक्तगटानुसार (blood group) आपला आहार ठरवला तर निश्चितच त्याच्या आरोग्याला मोठे फायदे होतील.

रक्तगटाच्या आधारे घेतलेला आहार शरीर जलद पचवण्यास सक्षम आहे. वेबएमडीच्या अहवालानुसार, प्रत्येक रक्तगटाचे स्वतःचे वेगळे स्वरूप असते. म्हणूनच आपल्या खाण्यापिण्याचा थेट संबंध रक्तगटाशी असतो.

O, A, B आणि AB असे चार प्रकारचे रक्तगट आहेत. कोणत्या रक्तगटाने कोणता आहार घ्यावा आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

A रक्तगटाने काय खावे – A रक्तगटाच्या लोकांनी आहारात हिरव्या भाज्यांव्यतिरिक्त टोफू, सीफूड आणि विविध प्रकारच्या कडधान्यांचा समावेश करावा. हे लोक ऑलिव्ह ऑइल, दुग्धजन्य पदार्थ, कॉर्न आणि सीफूड यांच्यासोबत उत्तम आहार संयोजन करू शकतात.

A रक्तगटाने काय खाऊ नये – तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, A रक्तगट असलेल्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती अत्यंत संवेदनशील(Sensitive) असते, त्यामुळे त्यांनी आपल्या खाण्यापिण्याची खूप काळजी घेतली पाहिजे. अशा लोकांना मांसाहार न घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

खरं तर आपल्या शरीराला मांस सहज पचवता येत नाही, म्हणूनच या लोकांना चिकन-मटण कमी खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

B (बी) ब्लड ग्रुपने काय खावे – बी (B) ब्लड ग्रुपचे लोक या बाबतीत सर्वात भाग्यवान असतात. वास्तविक, या रक्तगटाच्या लोकांना फारसे टाळावे लागत नाही. या रक्तगटातील लोकं हिरव्या पालेभाज्या, फळे, मासे, मटण आणि चिकन व सर्वकाही खाऊ शकतात.

B रक्तगट असणाऱ्यांनी ही काळजी घ्या – तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या रक्तगटाच्या लोकांची पचनक्रिया चांगली असते. त्यामुळे त्यांच्या शरीरात चरबी जमा होत नाही. हे लोक भरपूर दूध आणि त्यापासून बनवलेल्या वस्तू, अंडी इत्यादींचे सेवन करू शकतात.

तज्ञ म्हणतात की, बी रक्तगटाचे लोक हिरव्या भाज्या, मांस, मासे, अंडी आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचे सेवन मुक्तपणे करू शकतात, परंतु एक गोष्ट ल क्षात ठेवा की, त्यांच्या खाण्याच्या सवयी संतुलित असाव्यात.

AB(एबी) रक्तगट असेल तर संतुलित आहार ठेवा – AB रक्तगट फार कमी लोकांमध्ये आढळतो. ए आणि बी रक्तगटासाठी ज्या गोष्टी टाळायला सांगितल्या जातात, त्याच गोष्टी खातानाही त्यांनी काळजी घ्यावी. एबी रक्तगट असलेल्यांनी फळे आणि भाज्या अधिक प्रमाणात खाव्यात.

O रक्तगट असलेल्यांनी काय खावे – O रक्तगट असणाऱ्यांनी उच्च प्रथिनयुक्त आहार घ्यावा. त्यात मसूर, मांस, मासे, फळे इत्यादी अनेक गोष्टींचा समावेश होतो. तुमच्या आहारात धान्य आणि सोयाबीनांसह शेंगांचं प्रमाण संतुलित ठेवा.

या सर्व गोष्टी तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतील. वाढत्या वयानुसार काही लोकांना उच्च रक्तदाब, कमी रक्तदाब (low blood pressure)किंवा मधुमेह (diabetes) यांसारख्या समस्याही होऊ लागतात.

अशा परिस्थितीत सर्व रक्तगटाच्या लोकांनी आहाराबाबत एकदा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. व्यक्तीच्या वैद्यकीय स्थितीच्या आधारावर डॉक्टर त्यांना योग्य तो आहार सुचवू शकतात.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts