लाईफस्टाईल

Healthy Diet : निरोगी आरोग्यासाठी करा ‘या’ पदार्थांचे सेवन, जाणून घ्या कोणते पदार्थ?

Healthy Diet : रोज सकाळी रिकाम्या पोटी मोड आलेले कडधान्य खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. सकाळच्या नाश्त्यात हरभरा, सोयाबीन आणि मूग खाल्ल्याने शरीर तंदुरुस्त तसेच निरोगी राहते. याचे सेवन तुम्हाला दिवसभर उत्साही आणि ताजेतवाने ठेवते. तसे हरभरा, सोयाबीन आणि मूगमधील पोषक तत्व शरीराला ऊर्जा देण्याचे काम करतात. याशिवाय याचे नियमित सेवन केल्याने अशक्तपणा, पोटाशी संबंधित आजार आणि शारीरिक दुर्बलता यामध्ये फायदा होतो.

हरभऱ्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि प्रथिने यांसारखी पोषक तत्वे आढळतात. त्याच वेळी, सोयाबीन हे प्रथिने, निरोगी चरबी, कार्ब्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई, लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम यांसारख्या पोषक तत्वांचे भांडार आहे. याशिवाय मुगात तांबे, लोह, व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक आढळतात. त्यांचे जर आपण एकत्र सेवन केले तर आपल्या शरीराला अनेक अनोखे फायदे मिळतात. आजच्या या लेखात आपण याच्याच फायद्यांबद्दल जाणून घेणार आहोत.

भिजवलेले चणे, सोयाबीन आणि मूग एकत्र खाण्याचे फायदे :-

-शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यामुळे अनेक गंभीर आजार होण्याचा धोका असतो. अशातच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी रोज सकाळी हरभरा, सोयाबीन आणि मूग खाऊ शकतो. यामध्ये व्हिटॅमिन सीसह असे अनेक गुणधर्म आढळतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. आणि आपण लवकर आजारी पडत नाही.

-अशक्तपणा किंवा शरीरात रक्ताची कमतरता असेल तर तुम्ही दररोज सकाळी भिजवलेले हरभरे, सोयाबीन आणि मूग खाऊ शकता, हे खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये लोहासह अनेक पोषक घटक आढळतात, जे शरीरातील अशक्तपणा दूर करण्यास मदत करतात.

-शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यास हृदयाशी संबंधित गंभीर आजारांचा धोका असतो. खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. हरभरा, सोयाबीन आणि मूगमध्ये पुरेशा प्रमाणात फायबर असते. सकाळी नियमितपणे याचे सेवन केल्यास शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. आणि तुम्ही हृदयाशी संबंधित आजारांपासून लांब राहता.

-आजच्या या धावपळीच्या जीवनात अनेक लोक लठ्ठपणाच्या समस्येला बळी पडत आहेत. लठ्ठपणाचे मुख्य कारण म्हणजे खराब जीवनशैली, अशा स्थितीत तुम्ही अंकुरलेले किंवा भिजवलेले हरभरे, सोयाबीन आणि मूग रोज सकाळी सेवन करावे. त्यात पुरेशा प्रमाणात प्रथिने आणि फायबर असतात. यामुळे दिवसभर तुमचे पोट भरलेले राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

-पचनक्रिया मजबूत राहण्यासाठी फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. हरभरा, सोयाबीन आणि मूग या तिन्हींमध्ये आहारातील फायबरचे प्रमाण चांगले असते. सकाळी याचे सेवन केल्याने पचनक्रिया सुरळीत राहते आणि बद्धकोष्ठता आणि अपचन यांसारख्या समस्यांमध्ये हे खूप फायदेशीर आहे.

Renuka Pawar

Recent Posts