लाईफस्टाईल

Healthy Diet : तुम्हीही अंड्यासोबत केळीचे सेवन करता का? थांबा, जाणून घ्या नुकसान…

What Should Not Be Eaten With Egg : बऱ्याच जणांना कोणत्या पदार्थासोबत काय खावे किंवा खाऊ नये याबाबत संभ्रम असतो. तसेच सोशल मीडियाच्या वाढत्या क्रेझमुळे फूड कॉम्बिनेशन्सही खूप व्हायरल होत आहेत. इन्स्टाग्रामवर तुम्हाला दररोज काही ना काही व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील ज्यामध्ये अनेक खाद्यपदार्थ एकत्र करून तयार केले जातात. पण काहीवेळेला हे मिश्रण आरोग्यासाठी हानिकारक ठरते. 

अशातच बरेच लोक अंड्यांसोबत चुकीचे अन्न कॉम्बिनेशन करत आहेत. अंड्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते परंतु जर तुम्ही ते विरुद्ध गोष्टींसोबत सेवन केले तर ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. आज आपण अंड्यासोबत कोणत्या गोष्टी हानिकारक ठरू शकतात याबद्दल जाणून घेणार आहोत.

-तुम्ही अंड्यांसोबत साखर असलेली कोणतीही वस्तू खाल्ल्यास ते तुमचे खूप नुकसान करू शकते. जेव्हा या दोन गोष्टी एकत्र घेता तेव्हा त्यांच्यापासून तयार होणारे अमीनो ऍसिड शरीरात विषारी पदार्थ तयार करतात, ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या देखील होऊ शकतात. म्हणूनच सारखेच सेवन अंड्यासोबत टाळावे.

-अनेकांना नाश्त्यात अंड्यासोबत केळी खायला आवडते. पण या दोन्ही गोष्टी एकत्र खाल्‍यानेही नुकसान होऊ शकते. अंड्यांमध्ये जास्त प्रथिने असतात, तर केळीमध्ये जास्त पोटॅशियम असते. हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने पोट जड होते आणि ते पचायलाही वेळ लागतो.

-अनेकांना नाश्त्यात अंड्यांसोबत गरम चहा घेणे आवडते. पण हे दोन्ही सोबत घेतल्याने तुमची पचनक्रिया बिघडू शकते. जर अंडी कॅफिनसह घेतल्यास त्याचे प्रथिन मूल्य कमी होते. हे एकत्र सेवन केल्याने बद्धकोष्ठता आणि अपचन सारख्या समस्या उद्भवू शकतात.

-तुम्ही मांसासोबत अंडी खाल्ल्यास किंवा कोणत्याही डिशमध्ये एकत्र ठेवल्यास, हे मिश्रण तुमचे नुकसान करू शकते. अंड्यांमध्ये असलेले प्रथिने आणि मांसामध्ये असलेले अतिरिक्त फॅट्स पचन बिघडू शकतात. यांचे एकत्र सेवन केल्याने तुम्हाला थकवा आणि सुस्त वाटू शकते. त्यामुळे अंडी कधीही मांसासोबत खाऊ नयेत.

-सोया मिल्क अंड्यासोबत घेतल्यास अपचन आणि बद्धकोष्ठता देखील होऊ शकते. अंड्यांप्रमाणेच, सोया दुधातही प्रथिने जास्त प्रमाणात आढळतात, त्यामुळे ते एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया बिघडते. जास्त प्रथिने घेतल्यास शरीराला इतर पोषकद्रव्ये शोषण्यास वेळ लागतो.

-अंड्यांसह दूध, दही, कॉटेज चीज किंवा चीज यांसारखे दुग्धजन्य पदार्थ खाणे टाळावे. दुग्धजन्य पदार्थांमध्येही प्रथिने जास्त असतात. याव्यतिरिक्त, त्यांचे सेवन अंड्यासोबत केल्याने तुम्हाला जडपणा जाणवू शकतो, ज्यामुळे अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

Renuka Pawar

Recent Posts