Pumpkin Lentil Soup Benefits and Recipe : हवामानातील बदलासोबतच अनेक देखील आजार येतात, अशास्थित आपण आपल्या खाण्याच्या सवयींमध्येही काही बदल करणे गरजेचे आहे. बऱ्याच जणांची हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, ती वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात योग्य गोष्टींचा समावेश केला पाहिजे. जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल तर तुम्ही लवकर आजारी पडता, अशावेळी योग्य आहार घेणे फार महत्वाचे ठरते.
आज आम्ही तुम्हाला अशा एका पदार्थाबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल, आणि तुम्ही कमी आजारी पडाल, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात भोपळ्याचा समावेश करू शकता. भोपळ्यामध्ये जीवनसत्त्वे, मॅग्नेशियम, झिंक, ओमेगा, बीटा कॅरोटीन सारखे पोषक घटक असतात, जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास मदत करतात.
हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही भोपळा आणि मसूर डाळीचा सूप घेऊ शकता, हे खूप आरोग्यदायी मानले जाते, आज आपण भोपळा आणि मसूर डाळ सूप बनवण्याची रेसेपी आणि त्याचे फायदे जाणून घेणार आहोत, चला तर मग…
भोपळा मसूर सूप रेसिपी
साहित्य :-
भोपळा – २ कप (सोलून त्याचे तुकडे), मसूर डाळ – १ वाटी, आले – 1 टेबलस्पून (किसलेले), तूप – २ चमचे, मीठ – चवीनुसार, काळी मिरी – चवीनुसार, तुळशीची पाने – 3 – 4.
सूप बनवण्याची पद्धत :-
-भोपळा आणि मसूरचे सूप बनवण्यासाठी एक मोठे भांडे मध्यम आचेवर गरम करून त्यात तूप घालून वितळवून घ्या.
-आता त्यात किसलेले आले घालून सुगंध येईपर्यंत तळा.
-आता त्यात चिरलेला भोपळा आणि लाल मसूर घालून चांगले मिक्स करा. आता त्यात पाणी घालून काही वेळ गॅसवर ठेवा.
-साधारण 20 ते 25 मिनिटे मंद आचेवर, भोपळा आणि मसूर मऊ होईपर्यंत शिजवा.
-आता ते मिश्रण ब्लेंडरच्या मदतीने ब्लेंड करा.
-चवीनुसार मीठ आणि काळी मिरी घालून तुळशीच्या पानांनी सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा.
भोपळा-मसूर सूपचे आरोग्य फायदे :-
-भोपळ्यामध्ये असलेले बीटा-कॅरोटीन तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन ए ची कमतरता पूर्ण करते. व्हिटॅमिन ए तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि व्हायरल इन्फेक्शनशी लढण्यास मदत करते. भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन सी देखील असते, जे पांढऱ्या रक्त पेशींचे उत्पादन वाढवण्यास देखील मदत करते.
-मसूर डाळ व्हिटॅमिन बी, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध आहे, जे तुम्हाला मजबूत रोगप्रतिकारक शक्ती देण्यास मदत करते. मसूरमध्ये असलेले उच्च फ्लेव्होनॉइड आणि फायबर सामग्री पचनक्रियेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
-तुपामध्ये विशेषत: ब्युटीरिक ऍसिड असते, जे आतड्यात किलर टी पेशींच्या निर्मितीस समर्थन देते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. तूप व्हिटॅमिन ए चे सेवन वाढविण्यास देखील मदत करू शकते, जे डोळ्यांचे आणि त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी महत्वाचे आहे.
-आले तुमच्या पेशींना जळजळ वाढवणारे प्रथिने तयार करण्यापासून रोखून रोगप्रतिकारक आरोग्याला चालना देण्यास मदत करते.
-सूपमध्ये असलेली तुळशीची पाने तुमच्या शरीरातील टी हेल्पर पेशी आणि नैसर्गिक किलर पेशींची क्रिया वाढवते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.