Healthy Drinks : खराब जवनशैलीमुळे वजन वाढण्याची समस्या सामान्य झाली आहे, अशा स्थितीत अनेक जण आपले वजन कमी करण्यासाठी वेगवगेळ्या प्रकारचे व्यायाम करतात, पण अनेक वेळा वजन कमी करूनही पोटाची चरबी कमी होत नाही. पोटाची चरबी कमी करण्यासाठी, तुम्हाला अधिक कष्ट करावे लागते अशा स्थितीत तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयींकडे लक्ष देणे फार महत्वाचे ठरते.
पोटाची चरबी कमी करण्याचा सर्वोत्तम आणि प्रभावी मार्ग म्हणजे आपल्या जीवनशैलीत निरोगी बदल करणे. तुम्ही हेल्दी फूड्सच्या मदतीने तुमच्या पोटाची चरबीही कमी करू शकता. आज आम्ही तुम्हाला बेली फॅट कमी करण्यासाठी एक पेय सांगणार आहोत जिच्या मदतीने तुम्ही आरामात तुमच्या पोटाची चरबी कमी करू शकता. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहे हे पेय आणि ते बनवण्याची पद्धत :-
बेली फॅट बर्न करण्यासाठी आरोग्यदायी पेय
पेय बनवण्यासाठी साहित्य –
तुळशीची पाने – 2-3
दालचिनी – 1 इंच
हळद – ¼ टीस्पून
आले – 1 इंच
कृती
-सर्व प्रथम गॅसवर एक भांडे गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यात 2 कप पाणी घाला.
-आता या भांड्यात वर नमूद केलेले सर्व साहित्य घालून मिक्स करा.
-हे पेय गॅसवर 10 मिनिटे उकळवा.
-तुमचे बेली फॅट बर्नर ड्रिंक तयार आहे, ते गरम चहासारखे प्या.
-सर्वोत्तम परिणामांसाठी, तुम्हाला हे पेय सकाळी रिकाम्या पोटी प्यावे लागेल.
हे आरोग्यदायी पेय पिण्याचे फायदे
-यात आपण आल्याचा वापर केल्यामुळे त्याचे दाहक-विरोधी गुणधर्म वजन नियंत्रणात अप्रत्यक्षपणे मदत करू शकतात. याच्या सेवनाने पोटाची सूज कमी होते आणि चयापचय वाढतो.
-तसेच हळदीमध्ये दाहक-विरोधी आणि लठ्ठपणाविरोधी गुणधर्म असतात, जे शरीरातील वाढलेली चरबी कमी करण्यास, चयापचय वाढवण्यास आणि भूक कमी करण्यास मदत करतात.
-यात दालचिनी असल्यामुळे त्याच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत होते. दालचिनीमध्ये लिपिड थेंब आणि लोहयुक्त माइटोकॉन्ड्रिया असतात, जे अनावश्यक अन्नाची लालसा नियंत्रित करण्यास, चयापचय वाढवण्यास आणि पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करते.
-तुळशीची पाने चयापचय क्रिया वाढवते. तुमचे चयापचय जितके जलद होईल तितके कॅलरी बर्न करणे सोपे होईल. हे नैसर्गिकरित्या पचन सुधारण्यास मदत करते आणि आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते.
टीप : बेली फॅट बर्नर ड्रिंकचे सेवन केल्याने पोटाची चरबी लवकर कमी होण्यास मदत होईल, परंतु लक्षात ठेवा की आपल्या जीवनशैलीवर नियंत्रण ठेवणे खूप महत्वाचे आहे, अन्यथा कोणतेही पेय किंवा पद्धत वजन कमी करण्यास मदत करणार नाही.