लाईफस्टाईल

Health Benefits of Walnuts : तुम्ही एका दिवसात किती अक्रोड खाणे फायदेशीर आहे; जाणून घ्या….

Health Benefits of Walnuts : नट्स आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत हे आपण सर्वजण जाणतोच. विशेषतः जर आपण अक्रोड बद्दल बोललो तर ते आपल्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. देशात जवळपास प्रत्येक घरात अक्रोडचे सेवन केले जाते. विशेषत: माता आपल्या मुलांना अक्रोड आणि बदाम यासारख्या गोष्टी खायला देतात.

अक्रोडमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात, हा प्रथिने आणि चरबीचा चांगला स्रोत मानला जातो. कॅल्शियम आणि लोहासाठी अक्रोडचे सेवन केले जाते. अक्रोडमध्ये असंतृप्त चरबी असते, ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या आजारांपासून आपण दूर राहतो. यावरूनच लक्षात आले असेल अक्रोड खाणे आपल्यासाठी किती आवश्यक आहे. पण, प्रश्न नक्कीच उद्भवतो की एका दिवसात किती अक्रोड खाऊ शकतो? जास्त प्रमाणात अक्रोड खाणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते का? चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

जरी अक्रोड आरोग्यासाठी फायदेशीर असले, तरी ते मर्यादित प्रमाणात सेवन केले पाहिजे. एका दिवसात किती अक्रोड खावे आणि ते किती दिवस खावे. त्याचप्रमाणे, तुम्ही अक्रोड का सेवन करत आहात हे देखील महत्त्वाचे आहे? जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी करायचे असेल, तुम्ही दररोज 30 ते 60 ग्रॅम अक्रोडाचे सेवन करू शकता. कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून तुम्ही तुमचे हृदय निरोगी बनवता.

अक्रोड खाण्याचे फायदे :-

-अक्रोड अनेक प्रकारच्या पोषक तत्वांनी समृद्ध आहे. याचे सेवन केल्याने तुम्हाला अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात, अक्रोड पोटाशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी फार उपयुक्त ठरते. अक्रोडमध्ये निरोगी बॅक्टेरिया असतात, जे पोटाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. याशिवाय लठ्ठपणा आणि हृदयविकार कमी करण्यातही त्याचा हातभार लागतो.

-तसेच कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी देखील अक्रोडचे सेवन केले जाऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, अक्रोड खाल्ल्याने स्तनाचा कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग यांसारख्या अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होतो. अक्रोडमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे आरोग्य चांगले राहते.

-अक्रोड खाल्ल्याने भूक देखील नियंत्रित राहते. हे तुम्हाला जास्त खाण्यापासून प्रतिबंधित करते, जे वजन नियंत्रणात उपयुक्त ठरते. ज्यांना वजन वाढीची समस्या आहे त्यांच्यासाठी अक्रोड खूप फायदेशीर मानले जाते.

-वाढत्या वयामुळे अनेकदा आपली स्मरणशक्ती कमजोर होते. यासोबतच अल्झायमरसारखे घातक आजारही वाढत्या वयाचा परिणाम आहेत. अक्रोडाचे सेवन केल्याने मेंदूशी संबंधित या आजारांचा धोकाही कमी होतो. तसेच आपली स्मरणशक्तीही वाढते.

Renuka Pawar

Recent Posts