लाईफस्टाईल

High Cholesterol : उच्च कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांसाठी काळी द्राक्षे खूपच फायदेशीर…

High Cholesterol : हिवाळ्याच्या ऋतूमध्ये बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष विकायला येतात. यामध्ये वेगवेगळे द्राक्ष असतात. काहींना हिरवी द्राक्ष खायला आवडतात तर काहींना काळी द्राक्षे खायला आवडतात. दोन्ही आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप फायदेशीर आहेत.

कारण ते पौष्टिक आणि अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत. यामध्ये अत्यावश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे जसे की व्हिटॅमिन ए, सी, फायबर, प्रथिने, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोह चांगल्या प्रमाणात आढळतात, ज्यामुळे ते संपूर्ण आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.

अशातच द्राक्ष कोलेस्टेरॉल साठी देखील खूप फायदेशीर आहे. शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी काळी द्राक्षे खाणे अधिक फायदेशीर मानले जाते. कारण त्यांच्यात शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आढळतात.

जर उच्च कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांनी काळ्या द्राक्षांचे सेवन केले तर ते कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास खूप मदत करते. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काळी द्राक्षे खाण्याचे फायदे सांगणार आहोत. चला तर मग…

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काळी द्राक्षे खाण्याचे फायदे :-

काळ्या द्राक्षांमध्ये असलेले अँथोसायनिन्स आणि रेझवेराट्रोल नावाचे अँटीऑक्सिडंट हृदयरोगींमध्ये कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास अनेक प्रकारे मदत करतात. अँथोसायनिन्स शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण आणि जळजळ कमी करतात. काळी द्राक्षे खाल्ल्याने रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक तयार होण्यास प्रतिबंध होतो.

अँथोसायनिन्स शरीरातील नसांमध्ये जमा होणारे कोलेस्टेरॉल कमी करतात आणि चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी सुधारतात. त्याच वेळी, रेझवेराट्रोल देखील अशाच प्रकारे कोलेस्ट्रॉल कमी करण्यात भूमिका बजावते. त्यामुळे उच्च कोलेस्टेरॉल, रक्तदाब आणि हृदयाच्या रुग्णांनी काळ्या द्राक्षांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी किती द्राक्षे खावीत ?

जर एखाद्या व्यक्तीला उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर तो दिवसातून 1-2 कप काळी द्राक्षे खाऊ शकतो. 200 ग्रॅम पर्यंत काळी द्राक्षे खाणे आरोग्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. पण जास्त काळी द्राक्षे खाणे टाळावे हे लक्षात ठेवा. कोणत्याही गोष्टीचे जास्त सेवन केल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते.

Renuka Pawar

Recent Posts