लाईफस्टाईल

Home Remedies for High BP : अचानक बीपी वाढलाय?, करा ‘हे’ 5 घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम !

Home Remedies for High BP : सध्याच्या या धावपळीच्या युगात खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीनमुळे शरीरात अनेक समस्या उद्भवतात. त्यापैकी एक म्हणजे उच्च रक्तदाबाची समस्या. ही समस्या सध्या सामान्य होत चालली आहे. अशास्थितीत खाण्यापिण्याच्या सवयीनकडे विशेष लक्ष देणे फार गरजेचे आहे.

उच्च रक्तदाबाची समस्या सध्या सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसून येत आहे. लठ्ठपणा, धूम्रपान आणि तणावामुळेही उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते. उच्च रक्तदाबामध्ये रक्त जलद वाहते. त्यामुळे लोकांना हृदयविकाराचा झटका, स्मरणशक्ती कमी होणे आणि किडनीच्या समस्यांसारखे गंभीर आजार होण्याची भीती वाढते.

सामान्य माणसाच्या शरीरात रक्तदाब १२०/८० एमएमएचजी दरम्यान असावा. हे प्रमाण ओलांडल्यास तो उच्च रक्तदाबाचा बळी ठरतो. अशा परिस्थितीत काही घरगुती उपाय आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही उच्च रक्तदाबापासून अराम मिळवू शकता.

उच्च रक्तदाबासाठी घरगुती उपाय :-

काळी मिरी

काळी मिरी शरीराच्या अनेक समस्यांवर फायदेशीर आहे. या समस्यामध्ये अर्धा ग्लास कोमट पाण्यात काळी मिरी पावडर प्यायल्यास उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून सुटका मिळते. याच्या सेवनाने तुम्ही दातदुखी दूर करू शकता आणि पचनसंस्था देखील मजबूत करू शकता.

हळदीचे सेवन

हळदीचे दूध तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते. जर तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर तुम्ही हळदीचे दूध सेवन करू शकता. हळदीचे दूध उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करते.

धूम्रपान आणि मद्यपान कमी करा

तुम्ही धुम्रपान करत असाल किंवा दारूचे सेवन करत असाल तर ते कमी करावे. कारण धूम्रपान आणि मद्यपानामुळे रक्तदाब वाढण्यास मदत होते.

लिंबूपाणी

जर तुमचा रक्तदाब अचानक वाढला असेल तर तो कमी करण्यासाठी तुम्ही दर तीन तासांनी लिंबू पाण्याचे सेवन करू शकता. याच्या सेवनाने उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो.

लसूण

लसणाच्या सेवनाने तुम्ही उच्च रक्तदाब नियंत्रित करू शकता. यासाठी तुम्हाला लसणाच्या दोन पाकळ्या नियमित खाव्या लागतील. त्याचबरोबर लसणाच्या सेवनाने रक्तदाबासोबत इतर प्रकारच्या समस्यांपासून आराम मिळतो. याच्या सेवनाने तुम्ही तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवू शकता, ज्यामुळे तुम्ही एकदम तंदुरुस्त राहता आणि कमी आजारी पडता.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts