लाईफस्टाईल

Hot Water : सर्दी आणि खोकल्यामध्ये गरम पाणी पिणे खरंच फायदेशीर आहे का?; जाणून घ्या तज्ञांचे मत

Is Drinking Hot Water Good For Cough And Cold : हवामानातील बदल आता जाणवू लागला आहे. हळूहळू थंडी वाढू लागली आहे. हिवाळा येताच बरेचजण आजारी पडू लागतात. हिवाळ्यात सर्दी, खोकला यांसारखे आजार सामान्य आहेत. मुख्यतः आजारी पाडण्याचे कारण म्हणजे रोज प्रतिकारशक्ती कमकुवत असणे.

अशातच सर्दी-संबंधित आजारांपासून दूर राहण्यासाठी खबरदारी घेणे खूप गरजेचे आहे, अशातच आपण सर्वप्रथम कोमट पाणी पिण्यास सुरुवात केली पाहिजे. असे मानले जाते की गरम पाणी पिण्याने केवळ सर्दी आणि खोकल्याचा धोका कमी होत नाही तर सर्दी आणि खोकल्यापासून बरे होण्यास देखील गती मिळते. हे खरंच घडतं का? याबाबत आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

कोमट पाणी पिणे सायनससारख्या गंभीर आजारांमध्ये खूप उपयुक्त मानले जाते. सायनस बहुतेकदा नाकाची ऍलर्जी किंवा सर्दीमुळे उत्तेजित होते. त्याच वेळी, आपण थंड हवामानात नियमितपणे गरम पाणी प्यायल्यास, त्याच्या लक्षणांचा प्रभाव कमी होऊ शकतो. तुमच्या लक्षात आले असेल की सायनसचे परिणाम कमी करण्यासाठी तज्ञ स्टीम घेण्याची शिफारस करतात.

त्याचप्रमाणे गरम पाणी पिणे देखील खूप फायदेशीर मानले जाते. सर्दी आणि खोकल्यामध्ये नाक बंद होते, घसा दुखणे यांसारख्या समस्या जाणवतात, अशातच कोमट पाण्याच्या सेवनाने या समस्यांपासून थोडासा आराम मिळतो. अशातच जर तुम्हाला सर्दी झाली असल्यास तुम्ही गरम पाण्याचे सेवन करू शकता.

बहुतेक लोकांची जीवनशैली आणि आहार योग्य नसतो. त्यामुळे वेळोवेळी शरीराचे डिटॉक्सिफिकेशन करावे लागते, त्यामुळे रोग दूर राहतो आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. तुम्हाला माहीत आहे का की गरम पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते. होय, तज्ज्ञांचे मते गरम पाणी प्यायल्याने शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स होते.

आपण दिवसभरात अशा अनेक गोष्टी खातो, ज्या दातांच्या आरोग्यासाठी चांगल्या मानल्या जात नाहीत. अनेक वेळा दातांची योग्य काळजी न घेतल्याने दातांची संवेदनशीलता वाढते. त्याचबरोबर तोंडात बर्फ किंवा आईस्क्रीम घेतल्यास दातांना मुंग्या येऊ लागतात. जे सहन करणे कठीण होते. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी, आपण कोमट पाणी पिऊ शकता. यामुळे तुमची प्रकृती सुधारण्यास सुरुवात होईल आणि तुमचे शरीरही हायड्रेटेड राहील. एवढेच नाही तर दातांमधील पोकळीचा धोकाही कमी होईल.

गरम पाणी प्यायल्याने शरीराची पचनसंस्था नीट काम करते. गरम पाणी प्यायल्याने शरीरात अन्न पचण्याची प्रक्रिया योग्य प्रकारे होते, ज्यामुळे आपण जे अन्न खातो ते पचण्यास मदत होते, म्हणजे गरम पाणी प्यायल्याने पोटाशी संबंधित समस्या कमी होतात आणि बद्धकोष्ठतेपासूनही आराम मिळतो. एकूणच गरम पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.

Renuka Pawar

Recent Posts