लाईफस्टाईल

Homemade mouthwash : घरच्या घरी या प्रकारे बनवा माउथवॉश

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :- कधी कधी बाजारातून विकत घेतलेला माउथवॉश तोंडाचा दुर्गंध दूर करू शकत नाही. तज्ज्ञांच्या मते, अन्न खाल्ल्यानंतर माऊथवॉश करणे खूप महत्त्वाचे आहे. माउथवॉशमुळे तोंडाची दुर्गंधी तर दूर होतेच पण श्वास ताजे होण्यासही मदत होते. अनेक वेळा श्वासाची दुर्गंधी येण्याचे कारण म्हणजे दात व्यवस्थित साफ न करणे.(Homemade mouthwash)

अशा स्थितीत दातांमध्ये साठलेले अन्न हळूहळू सडू लागते आणि श्वासाला दुर्गंधी येते. पुष्कळ वेळा तोंडाला येणारा हा वास ब्रश करूनही कमी होत नाही आणि पुन्हा माउथवॉश वापरावा लागतो.घरी माऊथवॉश बनवण्याची पद्धत जाणून घ्या.

बेकिंग सोडा वापरा :- तोंडाच्या दुर्गंधीने त्रास होत असेल तर माउथवॉश म्हणून बेकिंग सोडा वापरा. त्यापासून माउथवॉश बनवण्यासाठी अर्धा ग्लास पाण्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा टाका. नंतर हे पाणी एका डब्यात ठेवा आणि माउथवॉश करा. या माउथवॉशमुळे तुमच्या तोंडाचा वास लवकरच निघून जाईल.

पेपरमिंट आणि टी ट्री ऑइल माउथवॉश :- ते बनवण्यासाठी एक कप पाण्यात दोन चमचे बेकिंग सोडा, 8-9 पुदिन्याची पाने आणि टी ट्री ऑइलचे दोन थेंब टाका, चांगले मिसळा आणि बाटलीत ठेवा. जेव्हा तुम्ही ते वापरता तेव्हा आधी एकदा बाटली चांगली हलवा.

ऍपल व्हिनेगर वापरा :- जर तुम्ही माउथवॉशसाठी अँपल व्हिनेगर वापरत असाल तर ते तुमच्या दातांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. अँपल व्हिनेगर दातदुखीची समस्या दूर करते तसेच तोंडाचा वास दूर करते. त्यापासून माउथवॉश बनवण्यासाठी 1 कप कोमट पाण्यात 3 चमचे अँपल व्हिनेगर घाला आणि चांगले मिसळा. आता ब्रश केल्यानंतर अँपल व्हिनेगरपासून बनवलेले माउथवॉश वापरा. होममेड ऍपल व्हिनेगर माउथवॉश तुमच्या तोंडातील दुर्गंधी दूर करेल तसेच दातांची किडणे कमी करेल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts