Skin Care : सर्वत्र उन्हळ्याच्या झळा जाणवू लागल्या आहेत, अशातच स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे फार गरजेचे आहे, आरोग्यासोबतच त्वचेची देखील काळजी घेतली गेली पाहिजे, उन्हळ्यात टॅनिंग होणे, डाग, त्वचा कोरडी पडणे अशा अनेक समस्या जाणवू लागतात. म्हणूनच आरोग्यासोबतच त्वचेची देखील काळजी घेणे महत्वाचे आहे.
आज बाजारात स्कीन संबंधित समस्या टाळण्यासाठी अनेक उत्पादने आहेत. परंतु कधीकधी या उत्पादनांचा उलट परिणाम होतो. कारण या उत्पादनांमध्ये अनेक प्रकारची रसायने आढळतात जी सर्व लोकांच्या त्वचेला शोभत नाहीत. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक घरगुती उपाय घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही उन्हाळ्यात तुमची त्वचा निरोगी ठेवू शकता.
जर तुम्हाला उन्हाळ्यात टॅनिंग फ्री तसेच अनेक समस्यांपासून सुटका हवी असेल तर तुम्ही एलोवेरा जेलचा वापर करू शकता. एलोवेरा जेल हे टॅनिंग दूर करण्यासाठी एक नैसर्गिक उपाय आहे. एलोवेरा तुमच्या त्वचेवर कसे काम करते जाणून घेऊया…
– एलोवेरा वेरा जेलमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे उन्हात जळलेल्या त्वचेला शांत करण्यास मदत करतात.
-एलोवेरा वेरा जेलमध्ये 98 टक्के पाणी असते जे त्वचेला हायड्रेट आणि मऊ करण्यास मदत करते.
-तसेच यात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात जे त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास मदत करतात आणि त्वचा चमकदार बनवतात.
-त्वचेच्या पेशींचे पुनरुज्जीवन करण्यास आणि त्वचा निरोगी आणि चमकदार बनविण्यास देखील हे मदत करते.
एलोवेरा जेल कशाप्रकारे वापरावे?
-कोरफडीच्या ताज्या पानांपासून जेल काढा.
-टॅनिंग भागावर जाड थराने जेल लावा.
-15-20 मिनिटे सोडा.
-नंतर थंड पाण्याने धुवा.
-हे दररोज 2-3 वेळा करा. असे केल्याने तुम्हाला लगेच फरक जाणवेल.